ETV Bharat / bharat

'रोजगार हा सन्मान, तो देण्यास कधीपर्यंत सरकार मागे हटणार?' - बेरोजगारीवर राहुल गांधींचे टि्वट

रोजगार हा सन्मान आहे. सरकार कधीपर्यंत त्यांना हा सन्मान देण्यास मागे हटणार? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Sep 17, 2020, 12:22 PM IST

नवी दिल्ली - गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी विविध विषयांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. आज त्यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीबद्दल पुन्हा केंद्र सरकारला धारेवर धरले. रोजगार हा सन्मान आहे. सरकार कधीपर्यंत त्यांना हा सन्मान देण्यास मागे हटणार? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी एक वृत्त शेअर केले आहे. वृत्तानुसार देशात 1 कोटी लोक रोजगार मागत असून 1.77 लाख नोकऱ्या उपलब्ध आहे.

'हेच कारण आहे. देशातील युवक आज #राष्ट्रीय बेरोजगारी दिवस साजरा करत आहेत. रोजगार हा सन्मान आहे. सरकार कधीपर्यंत हा सन्मान त्यांना देण्यास नाही म्हणणार आहे', असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.

यापूर्वी 20 ऑगस्टला देखील राहुल गांधींनी देशातील रोजगारावर चर्चा केली होती. देशातील 90 टक्के रोजगार हे असंघटित क्षेत्रातून निर्माण होतात. मात्र, अधिस्थगन काळानंतर या क्षेत्रातील व्यवसाय बुडतील व त्यानंतर रोजगाराची समस्या निर्माण होईल, असे ते म्हणाले होते. तसेच त्यांनी या परिस्थितीसाठी मोदींना जबाबदार धरले होते.

दरम्यान, कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीचे भीषण चित्र समोर आले आहे. देशात टाळेबंदी लागू केल्यानंतर विविध उद्योग व व्यवसायांवर परिणाम झाला आहे. त्यातून देशातील नोकरी भरती आणि रोजगारावर परिणाम झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.