ETV Bharat / bharat

नो टू सिंगल यूज प्लास्टिक: घरोघरी जाऊन प्लास्टिक कचरा जमा करतोय इलेक्ट्र्रिकल इंजीनिअर

author img

By

Published : Jan 26, 2020, 1:23 PM IST

Updated : Jan 26, 2020, 3:26 PM IST

'कचरा आज आपल्यासाठी मोठी समस्या बनली आहे. जर आपण याकडे लक्ष दिले नाही, तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांची काय अवस्था होईल? त्यामुळे मी प्लास्टिक कचरा गोळा करण्याचं काम सुरू केले आहे'

plastic ban story
नो टू सिंगल यूज प्लास्टिक

मंगळुरू- कर्नाटकातील हुबळी जिल्ह्यातल्या एका इंजिनिअरने वाढत्या प्लास्टिक कचऱ्याविरोधात युद्ध पुकारले आहे. व्यवसायाने इंजिनिअर असलेले वीरप्पा आरकेरी घरोघरी जाऊन प्लास्टिक कचरा गोळा करतात. प्लास्टिक कचऱ्यामुळे होणाऱ्या धोक्यांपासून ते लोकांमध्ये जनजागृती करत आहेत.

वीरप्पा कॉम्प्युटर आणि शिवनकाम प्रशिक्षकाचे कामही करतात. लोकांकडून जमा केलेल्या प्लास्टिकचे पैसे देता यावेत हा उद्देश समोर ठेवून ते एकावेळी अनेक काम करतात.

घरोघरी जाऊन प्लास्टिक कचरा जमा करतोय इलेक्ट्र्रिकल इंजीनिअर

हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक : अन्य राज्यांसाठी मॉडेल बनत आहे अंबिकापूर 'कचरा व्यवस्थापन'

ईटीव्ही भारतशी बोलताना वीरप्पा म्हणाले की, प्लास्टिक कचरा आज आपल्यासाठी मोठी समस्या बनली आहे. जर आपण याकडे लक्ष दिले नाही, तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांची काय अवस्था होईल? त्यामुळे मी प्लास्टिक कचरा गोळा करण्याच काम सुरू केले आहे. हे काम मी मागील पाच वर्षांपासून करत आहे. या कामासाठी हुबळीतील धारवाड येथील महिला मला मदत करतात.

या कामाची सुरुवात करणे वीरप्पा यांच्यासाठी सोप्पे नव्हते. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. लोकांनी त्यांना प्लास्टिक मोहिमेत सहकार्य करण्यास नकार दिला. मात्र, वीरप्पा यांनी हार मानली नाही, जो निर्धार मनाशी केला होता, त्यावर काम करत राहीले. हळूहळू जसे त्यांच्या कामाला यश आल तसे लोक त्यांच्या कामाशी जोडले गेले. आणि प्लास्टिक विरोधी अभियानात सहभागी झाले.

हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिक कचरा द्या आणि पोटभर जेवण करा

वीरप्पा यांच्याबद्दल सांगताना एक स्थानिक महिला म्हणाली, वीरप्पा यांनी सुरू केलेले काम प्रशंसनीय आहे. ज्यामध्ये आपल्या कुटुंबाचीही साथ नाही, असे काम करणे खुप अवघड असते. जेव्हा वीरप्पा घरोघरी जाऊन कचरा गोळा करायचे, लोक त्यांना चांगले समजत नव्हते. मात्र, तरीही त्यांनी हार मानली नाही, परिणामी आज अनेक नागरिक त्यांच्या कामात सहभागी झाले आहेत.

आज अशा अनेक गृहीनी आहेत ज्या घरामध्ये कचरा गोळा करून ठेवतात, आणि वीरप्पा यांना देतात. वीरप्पा यांनी एकट्याने हे अभियान सुरू केले होते. मात्र, आता अनेक नागरिक यामध्ये सहभागी होऊन त्यांना साथ देत आहेत.

हेही वाचा - प्लास्टिक बॉटल नष्ट करून मोबाईल रिचार्ज करा; रेल्वे मंत्रालयाचा उपक्रम

Intro:Body:

कर्नाटक: घरोघरी जाऊन प्लास्टिक कचरा जमा करतोय इलेक्ट्र्रिकल इंजीनिअर

मंगळुरू- कर्नाटतील हुबळी जिल्ह्यातल्या एका इंजिनिअरने वाढत्या प्लास्टिक कचऱ्याविरोधात युद्ध पुकाले आहे. व्यवसायाने इंजिनिअर असलेले वीरप्पा आरकेरी घरोघरी जाऊन प्लास्टिक कचरा गोळा करतात. प्लास्टिक कचऱ्यामुळे होणाऱ्या धोकांपासून ते लोकांमधे जनजागृती करत आहेत.

वीरप्पा कॉम्प्युटर आणि शिवनकामाचे प्रशिक्षकाचे कामही करतात. लोकांकडून जमा केलेल्या प्लास्टिकचे पैसे देता यावेत हा उद्देश समोर ठेवून ते एकावेळी अनेक काम करतात.

ईटीव्ही भारतशी बोलताना विरप्पा म्हणाले की, प्लास्टिक कचरा आज आपल्यासाठी मोठी समस्या बनली आहे. जर आपण याकडे लक्ष दिले नाही, तर आपल्या येणाऱया पिढ्यांची काय अवस्था होईल? त्यामुळे मी प्लास्टिक कचरा गोळा करण्याच काम सुरू केले आहे. हे काम मी मागील पाच वर्षांपासून करत आहे. या कामासाठी हुबळीतील धारवाड येथील महिला मला मदत करतात, असे ते म्हणाले.   

या कामाची सुरुवात करणे वीरप्पा यांच्यासाठी सोप्पे नव्हते. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. लोकांनी त्यांना प्लास्टिक मोहिमेत सहकार्य करण्यास नकार दिला. मात्र, विरप्पा यांनी हार मानली नाही, जो निर्धार मनाशी केला होता, त्यावर काम करत राहीले. हळूहळू जसे त्यांच्या कामाला यश आल तसे लोक त्यांच्या कामाशी जोडले गेले. आणि प्लास्टिक विरोधी अभियानात सहभागी झाले.

वीरप्पा यांच्याबद्दल सांगताना एक स्थानिक महिला म्हणाली, वीरप्पा यांनी सुरू केलेले काम प्रशंसनीय आहे. ज्यामध्ये आपल्या कुटुंबाचीही साथ नाही, असे काम करणे खुप अवघड असते. जेव्हा विरप्पा घरोघरी जाऊन कचरा जमा करायचे, लोक त्यांना चांगले समजत नव्हते. मात्र, तरीही त्यांनी हार मानली नाही, परिणामी आज अनेक नागरिक त्यांच्या कामात सहभागी झाले आहेत.

आज अशा अनेक गृहीनी आहेत ज्या घरामध्ये कचरा गोळा करून ठेवतात, आणि विरप्पा यांना देतात. वीरप्पा यांनी एकट्याने हे अभियान सुरू केले होते. मात्र, आता अनेक नागरिक यामध्ये सहभागी होऊन त्यांना साथ देत आहेत.

Conclusion:
Last Updated : Jan 26, 2020, 3:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.