ETV Bharat / bharat

मोदींच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या तेज बहादूरची उमेदवारी धोक्यात ! आयोगाची नोटीस

author img

By

Published : Apr 30, 2019, 8:05 PM IST

सोमवारी तेज बहादुर यादव यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आयोगाने बीएसएफ प्रशासनाकडून निवडणूक लढण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्याची नोटीस तेज बहादुरला पाठवली आहे.

पंतप्रधान मोदी आणि तेज बहादुर यादव

लखनौ - पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढणारे समाजवादी पक्षाचे उमेदवार आणि बडतर्फ बीएसएफ सैनिक तेज बहादुर यादव यांचा उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो. यासाठी निवडणूक आयोगाने त्यांना एक नोटीस पाठवली आहे. २४ तासाच्या आत त्यांनी नोटीसमध्ये नमूद प्रमाणपत्र जमा न केल्यास त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो.

सोमवारी तेज बहादुर यादव यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आयोगाने बीएसएफ प्रशासनाकडून निवडणूक लढण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्याची नोटीस तेज बहादुरला पाठवली आहे. बीएसएफमधून कोणत्या आधारावर बडतर्फ करण्यात आले होते. याबद्दल त्यामध्ये स्पष्टीकरण असावे, अशी ताकीदही आयोगाने नोटीसात सुनावली आहे.

तेज बाहादुर यादव यांना हे प्रमाणपत्र १ मेला सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्हाध्यक्ष कार्यालयात जमा करणे अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज वैध किंवा अवैध हे ठरवण्यात येईल. मी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढू नये म्हणून सरकारी तंत्राचा अवैधरित्या वापर करण्यात येत आहे, असा आरोप तेज बहादुर यांनी लावला आहे.

शेवटच्या क्षणी दिली उमेदवारी -

तेज बहादुर यादव पंतप्रधान मोदींच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढणार होते. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना शेवटच्या क्षणी समाजवादी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. तर, पूर्वीच घोषित केलेल्या शालिनी यादव यांचा उमेदवारी अर्ज पक्षाने परत घेतला होता.

तेज बहादुर यादव यांनी बीएसएफ जवानांना मिळणाऱ्या जेवणावर प्रश्नचिन्ह उचलले होते. त्यांनी याबद्दल अनेक अधिकाऱ्याला पत्र लिहून त्याबद्दल सूचनाही दिल्या होत्या. मात्र, त्यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे आपण व्हिडिओ बनवून ते फेसबूकच्या माध्यमातून जगजाहीर केले, असे तेज बहादूर यादवचे म्हणणे आहे.

Intro:Body:

National NEWS 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.