ETV Bharat / bharat

नित्यानंद यांना आश्रय दिला नाही - इक्वाडोर

बलात्कार प्रकरणातील आरोपी नित्यानंद याने गेल्यावर्षी नेपाळमार्गे भारतातून पळ काढला होता. यानंतर त्याने इक्वाडोर देशात आश्रय मिळवून तेथे स्वतःचे ‘सार्वभौम हिंदू राष्ट्र’स्थापन केले आहे, अशा बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या.

Ecuador denies sheltering Nithyananda, says rape-accused may be in Haiti
नित्यानंद यांना आश्रय दिला नाही : इक्वेडोर
author img

By

Published : Dec 13, 2019, 7:46 PM IST

नवी दिल्ली - फरार स्वयंघोषित गुरू स्वामी नित्यानंद याची इक्वाडोर येथील स्वतंत्र राष्ट्रस्थापनेची बातमी या देशाच्या भारतातील दूतावासाने फेटाळून लावली आहे. नित्यानंद हैती या देशात वास्तव्यास असल्याचा अंदाज दूतावासाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

बलात्कार प्रकरणातील आरोपी नित्यानंद याने गेल्यावर्षी नेपाळमार्गे भारतातून पळ काढला होता. यानंतर त्याने इक्वाडोर देशात आश्रय मिळवून तेथे स्वतःचे ‘सार्वभौम हिंदू राष्ट्र’स्थापन केले आहे, अशा बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. इक्वाडोरने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, 'स्वयंघोषित गुरू नित्यानंद याला इक्वाडोरने आश्रय दिला आहे किंवा इक्वाडोर सरकारने त्याला दक्षिण अमेरिकेजवळ किंवा इक्वाडोरच्या आसपास भूखंड खरेदी करण्यासाठी मदत केली आहे, अशा स्वरुपाच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांना इक्वाडोर दूतावासाची मान्यता नाही.'

'नित्यानंद यांनी इक्वाडोरकडे आंतरराष्ट्रीय वैयक्तिक संरक्षणाची (आश्रय) मागणी केली होती. ही मागणी इक्वाडोरने नाकारली होती. यानंतर त्यांनी कदाचित हैती देशात जाण्यासाठी इक्वाडोर सोडले असावे,'असेही यात म्हटले आहे. त्याचप्रमाणे या वादग्रस्त गुरूसंदर्भातील बातम्यांमध्ये आपल्या देशाचा उल्लेख टाळण्याचे आवाहन करताना इक्वाडोर दूतावासाने म्हटले आहे, की 'सर्व मुद्रित आणि वेब माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना नित्यानंद किंवा त्यांच्या लोकांमार्फत चालविल्या जाणाऱ्या संकेतस्थळावरील माहितीचा आधार घेण्यात आला आहे. यापुढे सर्व माध्यम संस्थांनी नित्यानंद यांच्यासंदर्भातील कोणत्याही बातमीत इक्वाडोरचा उल्लेख करू नये.'

नित्यानंदाने खासगी बेटावर स्थापन केलेल्या कैलास देशाचा नेमका पत्ता माहिती नाही. मात्र, 'आपल्या देशात हिंदुत्वाचे पालन करण्याचा अधिकार बाळगणाऱ्या जगभरातील निर्वासित हिंदूंसाठी कोणत्याही सीमा नसलेले राष्ट्र' असे वर्णन या देशाच्या संकेतस्थळावर करण्यात आले आहे. तसेच या स्वतंत्र राष्ट्रात हिंदूंना मोफत अन्न, आरोग्य व शिक्षणासह इतर अनेक सुविधा देण्यात येतील, असेही जाहीर करण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून नित्यानंद याने आपल्या देशाचे नागरिकत्व स्वीकारण्याचे आवाहन केले असून देश चालविण्यासाठी निधीची मागणी केली आहे.

कर्नाटक पोलिसांच्या माहितीनुसार, नित्यानंद याने जामीन मिळाल्यानंतर 2018 वर्षाच्या अखेर भारत सोडून पलायन केले असावे. नित्यानंद याच्या पासपोर्टची मुदत सप्टेंबर 2018 मध्येच संपली आहे, या पासपोर्टचे नूतनीकरण झालेले नव्हते. कदाचित त्याने कायद्यातून पळवाट शोधण्यासाठी बनावट पासपोर्ट आणि कागदपत्रांचा वापर केला असावा, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

राजशेखरन ऊर्फ नित्यानंद हा मूळचा तामिळनाडू येथील रहिवासी आहे. गुजरातजवळ असलेल्या आश्रमात त्याच्यावर बलात्कार, लैंगिक अत्याचार व बाल शोषणाचे आरोप आहेत.

हेही वाचा : धक्कादायक..! तामिळनाडूमध्ये विष घेऊन एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या

Intro:Body:

नित्यानंद यांना आश्रय दिला नाही :  इक्वेडोर

नवी दिल्ली - फरारी स्वयंघोषित गुरु स्वामी नित्यानंद याची इक्वेडोर येथील स्वतंत्र राष्ट्रस्थापनेची बातमी या देशाच्या भारतातील दूतावासाने फेटाळून लावली आहे. नित्यानंद हैती या देशात वास्तव्यास असल्याचा अंदाज दूतावासाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

बलात्कार प्रकरणातील आरोपी नित्यानंद याने गेल्यावर्षी नेपाळमार्गे भारतातून पळ काढला होता. यानंतर त्याने इक्वेडोर देशात आश्रय मिळवून तेथे स्वतःचे ‘सार्वभौम हिंदू राष्ट्र’स्थापन केले आहे, अशा बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या.

इक्वेडोरने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, 'स्वयंघोषित गुरु नित्यानंद याला इक्वेडोरने आश्रय दिला आहे किंवा इक्वेडोर सरकारने त्याला दक्षिण अमेरिकेजवळ किंवा इक्वेडोरच्या आसपास भूखंड खरेदी करण्यासाठी मदत केली आहे,  अशा स्वरुपाच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांना इक्वेडोर दूतावासाची मान्यता नाही.'

'नित्यानंद यांनी केलेली इक्वेडोरकडे आंतरराष्ट्रीय वैयक्तिक संरक्षणाची (आश्रय) मागणी केली होती. ही मागणी इक्वेडोरने नाकारली होती. यानंतर त्यांनी कदाचित हैती देशात जाण्यासाठी इक्वेडोर सोडले असावे,'असेही यात म्हटले आहे.

त्याचप्रमाणे, या वादग्रस्त गुरुसंदर्भातील बातम्यांमध्ये आपल्या देशाचा उल्लेख टाळण्याचे आवाहन करताना इक्वेडोर दूतावासाने म्हटले आहे की, 'सर्व मुद्रित आणि वेब माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना श्री नित्यानंद किंवा त्यांच्या लोकांमार्फत चालविल्या जाणाऱ्या संकेतस्थळावरील माहितीचा आधार घेण्यात आला आहे. यापुढे सर्व माध्यम संस्थांनी श्री नित्यानंद यांच्यासंदर्भातील कोणत्याही बातमीत इक्वेडोरचा उल्लेख करु नये.'

नित्यानंदाने खासगी बेटावर स्थापन केलेल्या कैलास देशाचा नेमका पत्ता कळून आलेला नाही. मात्र, 'आपल्या देशात हिंदुत्वाचे पालन करण्याचा अधिकार बाळगणाऱ्या जगभरातील निर्वासित हिंदूंसाठी कोणत्याही सीमा नसलेले राष्ट्र' असे वर्णन या देशाच्या संकेतस्थळावर करण्यात आले आहे. तसेच, या स्वतंत्र राष्ट्रात हिंदूंना मोफत अन्न, आरोग्य व शिक्षणासह इतर अनेक सुविधा देण्यात येतील, असेही जाहीर करण्यात आले आहे.

या संकेतस्थळाच्या माध्यमातून नित्यानंद याने आपल्या देशाचे नागरिकत्व स्वीकारण्याचे आवाहन केले असून देश चालविण्यासाठी निधीची मागणी केली आहे.

कर्नाटक पोलिसांच्या माहितीनुसार, नित्यानंद याने जामीन मिळाल्यानंतर 2018 वर्षाच्या अखेर भारत सोडून पलायन केले असावे. नित्यानंद याच्या पासपोर्टची मुदत सप्टेंबर 2018 मध्येच संपली आहे, या पासपोर्टचे नूतनीकरण झालेले नव्हते. कदाचित त्याने कायद्यातून पळवाट शोधण्यासाठी बनावट पासपोर्ट आणि कागदपत्रांचा वापर केला असावा, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

राजशेखरन ऊर्फ नित्यानंद हा मूळचा तामिळनाडू येथील रहिवासी आहे. गुजरातजवळ असलेल्या आश्रमात त्याच्यावर बलात्कार, लैंगिक अत्याचार व बाल शोषणाचे आरोप आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.