दिल्ली- लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांवर संकट कोसळले आहे. फतेहपूर बेरी परिसरातील लोहार मटके व अन्य वस्तू बनवून आपला परिवाराचा गाडा हाकत होते. मात्र, आता लॉकडाऊनमुळे काम नसल्याने लोहारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याप्रकरणी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने फतेहपूर बेरी परिसरात जाऊन लोहारांची विचारपूस केली. ते म्हणाले की, १५ वर्षापासून आम्ही फुटपाथवर राहून हाताने बनवलेली मटकी व इतर वस्तू विकायचो व जसे तसे आपले घर चालवायचो. मात्र, जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाले, तेव्हापासून हाताला काम नाही. हाती असलेले पैसे संपले असून घरातील रेशन देखील संपले आहे. त्यामुळे, आता जगायचे कसे हा प्रश्न आमच्यापुढे असल्याचे लोहारांनी सांगितले.
हेही वाचा- विषारी मशरूम खाल्ल्यामुळे दोघांचा मृत्यू, शिलॉंगमधील एकूण मृतांचा आकडा चार वर..