ETV Bharat / bharat

बिहार निवडणुकीसाठी आयोगाने नेमले 'विशेष खर्च निरीक्षक' - बिहार निवडणूक मधू महाजन विशेष खर्च निरीक्षक बातमी

मधू महाजन यांनी सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र,तामिळनाडू आणि कर्नाटकेचे विशेष खर्च निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. तसेच बी. आर. बालाकृष्णन यांची विशेष खर्च निरीक्षक म्हणून तेलगाणा राज्यातील हुजुरनगर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचे काम २०१९ मध्ये पाहिले आहे.

eci-appoints-special-expenditure-observers
बिहार निवडणुकीसाठी आयोगाने नेमले 'विशेष खर्च निरीक्षक'
author img

By

Published : Oct 4, 2020, 6:51 PM IST

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने बिहारमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीतील प्रत्येक पक्षाच्या व उमेदवारांच्या खर्चावर बारीक नजर ठेवण्यासाठी 'विशेष खर्च निरीक्षकां'ची नेमणूक केली आहे. या पदावर भारतीय महसूल सेवेच्या (IRS) सेवानिवृत्ती अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मधू महाजन आणि बी. आर. बालाकृष्णन अशी या विशेष खर्च निरीक्षकांचे नावे आहेत.

मधू महाजन हे १९८२ च्या आयआरएस बॅचचे असून बी. आर. बालाकृष्णन हे १९८३ च्या बॅचचे अधिकारी आहेत. हे विशेष खर्च निरीक्षक बिहार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया आणि या दरम्यान वापरण्यात येणाऱ्या साधन सामुग्रीवर नजर ठेवण्याचे काम करणार आहेत.

सीव्हीआयजीआयएल मोबाईल अॅप्लिकेशन आणि मतदार हेल्पलाईन१९५० च्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निवडणूक संबंधातील गुप्त माहिती व तक्रारींच्या आधारे कायद्याची कठोर व प्रभावी अंमलबजावणीची कारवाई करायची. जे पक्ष किवा उमेदवार मतदारांना रोख रक्कम, दारूचे वाटप करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे हे दोन अधिकारी निश्चित करतील.

मधू महाजन यांनी सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटकचे विशेष खर्च निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. तसेच बी. आर. बालाकृष्णन यांची विशेष खर्च निरीक्षक म्हणून तेलंगाणा राज्यातील हुजुरनगर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे काम २०१९ मध्ये पाहिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.