नवी दिल्ली - लोकसभा निवडणूकीच्या अनुशंगाने एक्झिट पोल संबंधित ट्विट काढून टाकण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. १९ मे रोजी निवडणूकीचा शेवटचा टप्पा होणार असून याच दिवशी एक्झिट पोल जाहिर करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाकडे एक्झिट पोल संदर्भात तीन मीडिया हाऊस विरोधात तक्रारी आल्या होत्या. यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. तसेच या मीडिया हाऊस विरोधात कारवाई का करु नये याबाबत आयोगाने स्पष्टीकरण मागितले आहे.