ETV Bharat / bharat

अरुणाचल प्रदेशातील निवडणुकांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांचे 'ट्रेकिंग' - ec officials

११ एप्रिलपासून देशात १७ व्या लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे. काही अत्यंत दुर्गम ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांना हवाई मार्गाने नेण्यात आले. तर काही ठिकाणी निवडणूक केंद्रावर पोहोचण्यासाठी अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना गिर्यारोहण करावे लागले.

अरुणाचल प्रदेश
author img

By

Published : Apr 13, 2019, 3:22 PM IST

मुक्तो - सर्व अडथळ्यांवर मात करत निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी १३ हजार ५८३ फूट उंचीवर चढाई केली. ही चढाई कोणता विक्रम प्रस्थापित करण्यासाठी नसून अरुणाचल प्रदेशात निवडणुका घेण्यासाठी त्यांना करावी लागली. मुक्तो विधानसभा मतदार संघात इतक्या उंचावर असलेले लुगुथंग हे गाव आहे.

arunachal pradesh
अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेशातील ६० विधानसभा मतदारसंघ आणि २ लोकसभा मतदारसंघांसाठी ११ एप्रिलला निवडणूक झाली. 'अरुणाचल प्रदेशातील निवडणुकांसाठी आम्हाला विविध अडथळे आणि आव्हाने पार करावी लागली. त्यात १३ हजार ५८३ फूट उंचीवर असेलल्या लुगुथंग या गावाचाही समावेश आहे. मतदारांसाठी आम्ही ही चढाई केली. येथील निवडणुकांसाठी आम्ही शक्य ते सर्व केले,' असे ट्विट निवडणूक आयोगाचे प्रवक्ते शेफाली शरण यांनी शनिवारी केले आहे.

११ एप्रिलपासून देशात १७ व्या लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली आहे. काही अत्यंत दुर्गम ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांना हवाई मार्गाने नेण्यात आले. तर काही ठिकाणी निवडणूक केंद्रावर पोहोचण्यासाठी अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना गिर्यारोहण करावे लागले.

या वेळी निवडणुकांना मिळणारा प्रतिसाद वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. येथे २ हजार २०२ निवडणूक केंद्रे आणि ७ लाख ९८ हजार २४९ मतदार होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.