ETV Bharat / bharat

आता आझम खान आणि मेनका गांधींवर निवडणूक आयोगाचा दणका; प्रचार बंदीचे आदेश

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर नेते जमेल तशी विधाने करत आहेत. सोमवारी निवडणूक आयोगाने मयावती आणि योगी आदित्यनाथ यांना प्रचार करण्यास बंदी घातली. त्यानंतर आझम खान यांना जयप्रदा यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे दणका दिला आहे.

आझम खान आणि मेनका गांधी
author img

By

Published : Apr 15, 2019, 11:40 PM IST

लखनौ - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्यावर निवडणूक आयोगाने प्रचार करण्याची बंदी आणल्यानंतर, अता पुन्हा दोन नेत्यांना आयोगाने दणका दिला आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि भाजप नेत्या मेनका गांधी यांचा समावेश आहे. प्रचार सभांमध्ये आचारसंहिता भंग केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर नेते जमेल तशी विधाने करत आहेत. सोमवारी निवडणूक आयोगाने मयावती आणि योगी आदित्यनाथ यांना प्रचार करण्यास बंदी घातली. त्यानंतर आझम खान यांना जयप्रदा यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे दणका दिला आहे. तर, भाजप नेत्या मेनका गांधी यांनी भर सभेत मुस्लिमांना धमकी दिल्यावरुन आयोगाने जोरदार धक्का दिला आहे.

आझम खान यांना आयोगाने ७२ तासापर्यंत कोणत्याही सभेत हजर न राहण्याचे निर्देश दिले आहे. तर, कोणत्याही स्थितीत प्रचार न करण्याची ताकीद दिली आहे. तसेच मेनका गांधी यांना ४८ तास प्रचार सभांमध्ये भाग घेणे आणि प्रचार करण्यावर बंदी आणली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता सक्रिय कारवाई करत आहे, हे स्पष्ट झाले आहे.

मंगळवारी सकाळी १० वाजतापासून त्यांना या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांच्यावर आयोग मोठी कारवाई करू शकते. त्यामध्ये त्यांना निवडणूकीच्या रिंगणातून बाहेर होण्याचेही आदेश मिळू शकतात.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.