नवी दिल्ली - दिल्ली विद्यापीठाने सोमवारी सर्व विभागप्रमुखांना ओपन बुक परीक्षा पद्धतीसाठी अंतिम वर्षाच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे निर्देश दिले.
कॉम्प्युटर सायन्स विभागाने बोलावलेल्या बैठकीत शिक्षकांना पेपरचे दोन सेट तयार करण्यास सांगण्यात आले. एक ऑनलाईन ओपन बुक परीक्षेसाठी तर दुसरे पेन-पेपर परीक्षेसाठी सांगितले.
ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा संगणक आहेत, ते जुलै महिन्यात ऑनलाईन परीक्षा देतील. तर जे ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाहीत, त्यांना पेन-पेपर परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप ठरवण्यात आलेले नाही.
कोरोनाचा संसर्ग अशाच पद्धतीने वाढत राहील्यास १ जुलैपासून अंतिम वर्षाच्या पदव्युत्तर आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात येईल. ओपन बुक पद्धतीने या परीक्षांचे आयोजन करण्यात येईल, असे दिल्ली विद्यापीठाने १४ मे रोजी घोषित केले होते.
ओपन बुक पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना बुक आणि नोट्समधून बघून प्रश्नांची उत्तरे सोडविता येणार आहे.
विद्यार्थी घरात बसूनच त्यांच्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका विद्यापीठाने दिलेल्या पोर्टलवरून डाऊनलोड करतील. या प्रश्नपत्रिका त्यांना दोन तासांत सोडवाव्या लागतील.
या निर्णयावर विद्यार्थी आणि शिक्षकांनी टीका केली आहे. ही परीक्षा पद्धती 'भेदभावपूर्ण' असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
परीक्षा शाखेने विशेषतः शेवटच्या सत्रातील परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली आहे. असे विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे डीन विनय गुप्ता यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या यादीमध्ये सांगितले गेले आहे.
विद्यापीठाने परीक्षा आयोजित करण्यासाठी घेतलेले निर्णय अत्यंत अस्पष्ट आणि पारदर्शक पद्धतीने घेतले जात आहेत, असे कार्यकारी समितीचे सदस्य राजेश झा यांनी स्पष्ट केले.