ETV Bharat / bharat

कोरोनावर गुणकारी 'रेमडेसिव्हिर' आता देशातच बनणार; 'हेटेरो' कंपनीला मिळाली परवानगी.. - रेमडेसिव्हिर हेटेरो कंपनी

हेटेरो कंपनी 'कोव्हिफोर' नावाने या औषधाची विक्री करणार आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर याचा वापर केला जाणार आहे. या औषधाचे कोरोना रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. आता आम्ही तातडीने देशभरातील कोरोना रुग्णांना हे औषध उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे, हेटेरो कंपनीचे चेअरमन बी. पार्थ सारधी रेड्डींनी म्हटले आहे.

Drug firm Hetero received approval from DCGI to launch Remdesivir for the treatment of COVID-19.
कोरोनावर गुणकारी 'रेमडेसिव्हिर' आता देशातच बनणार; 'हेटेरो' कंपनीला मिळाली परवानगी..
author img

By

Published : Jun 21, 2020, 6:21 PM IST

Updated : Jun 21, 2020, 7:19 PM IST

हैदराबाद : कोरोना उपचारावर प्रभावी असणाऱ्या रेमडेसिव्हिर औषधाच्या निर्मितीसाठी तेलंगाणामधील हेटेरो कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. 'ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'ने या कंपनीला रेमडेसिव्हिरचे उत्पादन आणि विक्री करण्याची परवानगी दिली आहे.

हेटेरो कंपनी 'कोव्हिफोर' नावाने या औषधाची विक्री करणार आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर याचा वापर केला जाणार आहे. या औषधाचे कोरोना रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. आता आम्ही तातडीने देशभरातील कोरोना रुग्णांना हे औषध उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे, हेटेरो कंपनीचे चेअरमन बी. पार्थ सारधी रेड्डींनी म्हटले आहे. देशातील रुग्णांना पुरेशा प्रमाणात औषध उपलब्ध करुन देण्यासाठी कंपनी सक्षम असल्याचेही रेड्डींनी स्पष्ट केले.

है औषध १०० मिलीग्रामच्या कुपीमध्ये उपलब्ध होणार आहे. हेल्थकेअर प्रॅक्टिशनरच्या देखरेखीखाली रूग्णालयाच्या सेटिंगमध्ये इंट्राव्हेन्ट्रीद्वारे दिले जावे लागेल, असे कंपनीने स्पष्ट केले. यासोबतच, गिलिएड सायन्स इनकॉर्पोरेटेड या कंपनीसोबत परवाना करारांतर्गत याचे उत्पादन केले जाणार आहे. जेणेकरून हे औषध पुढे कमी आणि मध्यम उत्पादन असणाऱ्या देशांमध्येही निर्यात करता येईल.

हेही वाचा : COVID-19 : गेल्या २४ तासांमध्ये १४ हजार रुग्णांवर यशस्वी उपचार; बरे होण्याचा दर ५५.४९ टक्क्यांवर..

Last Updated : Jun 21, 2020, 7:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.