ETV Bharat / bharat

कानपूरमध्ये दोन डंपरचा भीषण अपघात, डंपरला लागलेल्या आगीत चालकाचा मृत्यू - TWO DUMPER ACCIDENT

घाटमपूर परिसरात दोन डंपर एकमेकांना जोरदार धडकून अपघात झाला आहे. जोरदार धडकेमुळे एक डंपर बाजूच्या शेतात पलटला तर दुसऱ्या डंपरने भीषण पेट घेतला. या आगीत चालकाचा जळून मृत्यू झाला आहे.

road accident in kanpur
कानपूरमध्ये दोन डंपरचा भीषण अपघात
author img

By

Published : Oct 28, 2020, 10:13 AM IST

कानपूर - घाटमपूर परिसरात दोन डंपर एकमेकांना जोरदार धडकून अपघात झाला आहे. जोरदार धडकेमुळे एक डंपर बाजूच्या शेतात पलटला तर दुसऱ्या डंपरने भीषण पेट घेतला. या आगीत चालकाचा जळून मृत्यू झाला आहे. पेट घेतलेल्या डंपरमध्ये अजुन काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती.

कानपूरमध्ये दोन डंपरचा भीषण अपघात

नेमके काय घडले?

घाटमपूर परिसरात राष्ट्रीय महामार्ग 34 वर पतारा गावाजवळ कानपूर-हमीरपूर रोडवर ही दुदैवी घटना घडली आहे. भरधाव वेगात विरुद्ध दिशेने येणारे दोन डंपर समोरासमोर धडकून एका डंपरने पेट घेतला. रस्त्याच्या मधोमध डंपरने पेट घेतलेला होता तर दुसरा डंपर शेतात पलटी झाला. पेट घेतलेल्या डंपरमध्ये चालकाचा जळून मृत्यू झाला तर दोन्हीही डंपरमध्ये आणखी काही लोक अडकले असल्याची माहिती मिळते आहे. अग्निशमन दलाने काही वेळानत आगीवर नियंत्रण मिळवले. तर अडकलेल्या लोकांनी बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी बचाव सुरू केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.