ETV Bharat / bharat

म्यानमारहून आलेले २.७ किलो सोने जप्त, महसूल विभागाची कारवाई..

डीआरआय मिळालेल्या माहितीवरून, डीआरआयने शुक्रवारी रात्री दस्खिनेश्वर रेल्वे स्थानकावर आपला सापळा रचला होता. त्यावेळी कांचनजुंघा एक्सप्रेस (१३१७४) ही गाडी स्थानकावर दाखल झाली. त्यानंतर संध्याकाळी ७.२० च्या सुमारास डीआरआयने दोन संशयित व्यक्तींना पाहिले. त्यांचे वर्णन डीआरआयला मिळालेल्या माहितीशी मिळतेजुळते होते. त्यामुळे त्या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे हे सोने मिळाले.

DRI sleuths seize 2.7 kilo gold smuggled from Myanmar
म्यानमारहून आलेले २.७ किलो सोने जप्त, महसूल विभागाची कारवाई..
author img

By

Published : Mar 15, 2020, 12:19 PM IST

कोलकाता - महसूल संचलनालयाने (डीआरआय) शनिवारी २.७ किलो सोने जप्त केले. म्यानमारहून तस्करी करून हे सोने भारतात आणले होते. पश्चिम बंगालमधील कोलकात्याजवळच्या एका रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले असून, या सोन्याची किंमत सुमारे १.१३ कोटी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

डीआरआय मिळालेल्या माहितीवरून, डीआरआयने शुक्रवारी रात्री दस्खिनेश्वर रेल्वे स्थानकावर आपला सापळा रचला होता. त्यावेळी कांचनजुंघा एक्सप्रेस (१३१७४) ही गाडी स्थानकावर दाखल झाली. त्यानंतर संध्याकाळी ७.२० च्या सुमारास डीआरआयने दोन संशयित व्यक्तींना पाहिले. त्यांचे वर्णन डीआरआयला मिळालेल्या माहितीशी मिळतेजुळते होते. त्यामुळे त्या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे हे सोने मिळाले.

लालरेम्पुईया आणि रंगदुहकिमा अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांपैकी एकाने आपल्या पँटमध्ये बनवलेल्या विशेष खिशांमध्ये १६ सोन्याची बिस्किटे लपवली होती. त्यांनी याआधीही म्यानामारमधून भारतात यापद्धतीनेच सोने आणल्याचेही चौकशीदरम्यान कबूल केले.

चालू आर्थिक वर्षामध्ये डीआरआयने पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधून सुमारे २७८ किलो सोने जप्त केले आहे.

हेही वाचा : मिलानमधील २१८ भारतीय मायदेशी परतले, २११ विद्यार्थ्यांचा समावेश..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.