ETV Bharat / bharat

दिवाळीनंतर दुसर्‍या दिवशी चित्रकूटमध्ये भरतो गाढवांचा बाजार - चित्रकूटमध्ये गाढवांची यात्रा

दिवाळीनंतर दुसर्‍या दिवशी धर्मनगरी चित्रकूटमध्ये गाढवांचा बाजार आयोजित करण्यात आला होता. मुघल काळानंतर भरलेल्या या बाजाराची सुरुवात मुघल शासक औरंगजेबाने केली होती. यावेळी कोरोनामुळे गाढव बाजारात व्यापाऱ्यांची कमतरता जाणवली.

Donkey mela
गाढवांची यात्रा
author img

By

Published : Nov 16, 2020, 8:00 AM IST

Updated : Nov 16, 2020, 9:21 AM IST

चित्रकूट (उत्तर प्रदेश) - दिवाळीनंतर दुसर्‍या दिवशी उत्तर प्रदेशात धर्मनगरी चित्रकूटमध्ये गाढवांचा बाजार आयोजित करण्यात आला होता. या ऐतिहासिक बाजारात देश आणि राज्यातील व्यापारी आपल्या गाढवांसह आले होते. हा बाजार मुघलशासक औरंगजेबाने सुरू केली होती. औरंगजेबाने घोड्यांच्या टंचाईनंतर सैन्याच्या ताफ्यात गाढवे आणि खेचरे यांचा समावेश केला. त्यानंतर हा बाजार भरण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून ही यात्रा आयोजित केली जाते. यावर्षी कोरोना विषाणूमुळे गाढवांच्या व्यापारामध्येही घट झाली आहे.

मुघल सम्राट औरंगजेब यांनी यात्रेला सुरुवात केली होती-

असे म्हटले जाते की, मुघल शासक औरंगजेबच्या सैन्याच्या ताफ्यातील घोडे अचानक आजारी पडल्याने मरण पावले होते. त्यानंतर मुघल शासक औरंगजेबाने आपल्या सैन्याच्या ताफ्यात गाढवे व खेचरे खरेदी केली. तेव्हापासून हा बाजार सतत आयोजित केला जातो. चित्रकूटच्या रामघाटात मंदाकिनी नदीच्या काठावर भरणाऱ्या या बाजाराची सर्व व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून केली जाते.

आयोजक कमलेश पांडे म्हणाले की, चित्रकूटमधील गाढवांचा बाजार ऐतिहासिक आहे. या बाजाराची परंपरा मुघल सम्राट औरंगजेबने सुरू केली होती.

कोरोनाचा परिणाम-

यावेळी कोरोना महामारीमुळे यात्रेत व्यापारी कमी होते. यंदा हा बाजार भरणार की नाही याची व्यापाऱ्यांना माहिती नव्हती. त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या मते येथे गाढवांना चांगली किंमत मिळते. व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे, की या दिवशी खरेदी व विक्री केल्यामुळे लक्ष्मी येते, असे कमलेश पांडे म्हणाले.

हेही वाचा- देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

हेही वाचा- बीड अ‌ॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपीच्या देगलूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Last Updated : Nov 16, 2020, 9:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.