वॉशिंग्टन - काश्मीर प्रश्नी आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मागण्यासाठी गेलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. इम्रान खान आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काल (सोमवार) चर्चा झाली. त्यावेळी खान यांना शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली. काश्मीर प्रश्नी एका पाकिस्तानी पत्रकाराने प्रश्न विचारला असता ट्रम्प यांनी उलट इम्रान यांना 'असले पत्रकार तुम्हाला कोठे भेटतात, असा प्रश्न केला.
पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प यांनी दिलेल्या या उत्तरामुळे सगळीकडे हशा पिकला. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुर्णपणे बंद आहे. संपर्क व्यवस्था आणि इंटरनेट बंद आहे. लोकांना अन्न मिळत नाही, त्यामुळे मानवाधिकार उल्लंघनावर तुम्ही काय कराल? असा प्रश्न एका पाकिस्तानी पत्रकाराने ट्रम्प यांना विचारला. या प्रश्नावर ट्रम्प भडकले. तुम्हाला असले पत्रकार कुठे भेटतात? असा उलट प्रश्न ट्रम्प यांनी इम्रान खान यांना विचारला. त्यामुळे इम्रान खान चांगलेच नरमले होते.
काश्मीर प्रश्न अमेरिकेत मांडण्यासाठी तसेच संयुक्त राष्ट्रामध्ये सहकार्य मिळवण्यासाठी इम्रान खान प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळताना दिसत नाही. उलट इम्रान खान यांच्या समोरच ट्रम्प यांनी मोदींची प्रशंसा केली. तसेच दोन्ही देश तयार असतील तरच काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करणार असल्याचे ट्रम्प म्हणाले.