बांदिपोरा (ज.का)- हाजीन येथील सामुदायिक आरोग्य केंद्रातील डॉक्टराशी एका पोलीस उपायुक्ताने गैरवर्तन केले होते. त्यानंतर, या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील डॉक्टरांनी संप पुकारला होता आणि पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली होती. मात्र, नागरी आणि पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण निवळले आहे. डॉक्टरांनी संप सोडला असून ते नोकरीवर रुजू झाले आहेत.
पोलीस आणि डॉक्टरांमध्ये संवादाचा अभाव आहे. याच्या व्यतरिक्त त्यांच्यामध्ये कसलेही मतभेद नाही. आम्ही मुद्दा सोडवला असून आरोग्य केंद्रातील डॉक्टर नोकरीवर रुजू झाले आहेत, असे उपविभागीय जिल्हाधिकारी सैय्यद शाहनवाज बुखारी यांनी सांगितले. तसेच, आम्ही या घटनेचा निषेध करतो, डॉक्टर विवेकाने काम करातात, त्यामुळे ते नोकरीवर परत आले, असे काश्मीर डॉक्टर्स संघटनेने सांगितले.
हेही वाचा- आधीच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची चणचण, त्यात ५० कंत्राटी डॉक्टरांचा राजीनामा..