नवी दिल्ली - देशातील 15 राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये पौष्टिक तांदुळ वितरणाचे काम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आल्याचे केंद्रीय अन्नधान्य पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा तांदुळ उत्पादित करताना त्यामध्ये व्हिटामिन बी, व्हिटामिन B 12, आयर्न, फॉलिक अॅसिड समाविष्ट करण्यात येतात.
उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुरजरात, आंध्रप्रदेश, केरळ, ओडिशा, तामिळनाडू आणि आसाम या राज्यांचा या योजनेत समावेश आहे. यातील महाराष्ट्र, गुजरात आणि आंध्रप्रदेशात तांदुळ वाटपास सुरुवात झाली आहे, असे सार्वजनिक अन्नधान्य पुरवठा मंत्री रामविलास पासवान म्हणाले.
उत्तरप्रदेश आणि ओरिसा राज्यात लवकरच पौष्टिक तांदुळ वाटपाचे काम सुरू होणार आहे. इतर राज्यातही लवकच वितरण सुरू होणार आहे. या योजनेतील 75 टक्के खर्च केंद्र सरकार उचलणार आहे, तर 25 टक्के खर्च राज्यसरकारद्वारे करण्यात येणार आहे. हा तांदुळ उत्पादित करताना त्यामध्ये पौष्टीक तत्वे समाविष्ट करण्यात येतात. व्हिटामीन बी, व्हिटामीन B12, आयर्न, फॉलिक अॅसिड त्यामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे.
कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी हा पौष्टीक तांदुळ उपयुक्त ठरणार आहे. तसेच अॅनिमियावर सुद्धा यातील पौष्टिक तत्वांमुळे मात करता येणार आहे.