ETV Bharat / bharat

तिहेरी तलाक विधेयकावरुन लोकसभेत खडाजंगी - talaq

लोकसभेमध्ये आज विवादीत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु आहे. या चर्चेमध्ये भाजपचे खासदार आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलेली पहायला मिळत आहे.

तिहेरी तलाक
author img

By

Published : Jul 25, 2019, 3:32 PM IST

नवी दिल्ली - लोकसभेमध्ये आज विवादीत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु आहे. या चर्चेमध्ये भाजपचे खासदार आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलेली पहायला मिळत आहे. भाजपच्या खासदार मिनाक्षी लेखी आणि समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांच्यामध्ये तिहेरी तलाकवरुन आरोप-प्रत्यारोप झाले.

खासदार मिनाक्षी लेखी यांनी उत्तरप्रदेशात वाढत्या तिहेरी तलाक घटनांवरुन अखिलेश यादव सरकारला जबाबदार धरले. उत्तरप्रदेश राज्यात 'शरिया अदालत' चालतात. त्यामुळे तलाकच्या घटनांना प्रोत्साहन मिळते, असा आरोप लेखी यांनी केला. तिहेरी तलाक कायदा लागू करुन पंतप्रधान मोदी लोकांना त्यांचा हक्क देत आहेत, जो हक्क राजीव गांधींनी नाकारला होता, असे त्या म्हणाल्या.

याबरोबरच डीएमके खासदार कनिमोळी यांनीही तिहेरी तलाक विधेयकावरुन भाजपवर हल्ला चढवला. तिहेरी तलाक सोडून सरकारने प्रथम 'ऑनर किलिंग'वर कायदा बनवावा, असे त्या म्हणाल्या. हा कायदा बनवून सरकार लोकांमध्ये फुटीचा संदेश देत असल्याचा आरोप त्यांनी केला. महिला आरक्षण बिलावर सरकार काहीही करत नसल्याचे कनिमोळी म्हणाल्या.

केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या कायद्याला धर्माच्या चष्म्यातून न पाहता मानवतेच्या आणि न्यायाच्या भावनेतून पहावे, असे म्हटले. हा कायदा महिला सशक्तिकरण आणि न्यायाच्या बाजूने असल्याचे ते म्हणाले. २० इस्लामिक देशांनी तिहेरी तलाकवर बंदी आणली आहे, भारत का बंदी आणू शकत नाही, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.