ETV Bharat / bharat

दिल्लीत डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ; प्रतिलिटर 80.87 उच्चांकी दर - डिझेल दर वाढ दिल्ली

याआधी 29 जूनला पेट्रोल डिझेलच्या किमती वाढविण्यात आल्या होत्या. मागील एकाच महिन्यांत 23 वेळा डिझेलचे आणि 21 वेळा पेट्रोलचे दर वाढविण्यात आले आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 7, 2020, 7:17 PM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत डिझेलच्या किमतीत उच्चांकी वाढ झाली आहे. मंगळवारी डिझेलच्या दरात प्रति लिटर 25 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील डिझेलचा दर 80 रुपये 78 पैसे झाला आहे. आत्तापर्यंतचा डिझेलचा हा सर्वात जास्त दर आहे. सरकारी इंधन विक्री कंपनीने यासंबंधी पत्रक जारी केले आहे.

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ करण्यात येत आहे. कोरोना संकट असताना देशभरातून दरवाढीला विरोधही होत आहे. काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आठ दिवस किमतीत वाढ करण्यात आली नाही. मात्र, आता पुन्हा 25 पैशांनी डिझेलचे दर वाढविण्यात आले. प्रत्येक राज्यातील मुल्यावर्धीत करानुसार पेट्रोल डिझेलच्या किंमती बदलतात.

याआधी 29 जूनला पेट्रोल डिझेलच्या किमती वाढविण्यात आल्या होत्या. मागील एकाच महिन्यांत 23 वेळा डिझेलचे आणि 21 वेळा पेट्रोलचे दर वाढविण्यात आले आहेत. 7 जूननंतर आत्तापर्यंत पेट्रोल 9 रुपये 17 पैशांनी तर डिझेल 11.39 रुपयांनी वाढले आहे.

मुंबईमध्ये 29 जूननंतर पेट्रोलच्या किमतीत बदल करण्यात आला नाही. पेट्रोल 87.19 मात्र, डिझेल 79.05 वरून 78.83 प्रति लिटर झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.