ETV Bharat / bharat

पुलवामा हल्ल्यावेळी 'बीफ बिर्याणी' खाऊन झोपला होतात का, ओवेसींचा मोदींवर हल्ला - pm modi

'तुम्हाला बालाकोटमध्ये ३०० मोबाईल सुरू असलेले समजतात. मग, तुमच्या नाकाखाली कोणीतरी ५० किलो आरडीएक्स पुलवामामध्ये घेऊन आल्याचे कसे समजले नाही? पुलवामा हल्ल्यावेळी 'बीफ बिर्याणी' खाऊन झोपला होतात का,' असा प्रश्न ओवेसी यांनी विचारला आहे.

असदुद्दीन ओवेसी
author img

By

Published : Mar 24, 2019, 6:39 AM IST

हैद्राबाद - एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. 'पुलवामा हल्ल्यावेळी 'बीफ बिर्याणी' खाऊन झोपला होतात का,' असा सवाल त्यांनी केला आहे.

'भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये बॉम्ब टाकले. यानंतर अमित शाह यांनी २५० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगितले. तर, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एनटीआरओने या परिसरात ३०० मोबाईल फोन सुरू असल्याचे सांगितले. तुम्हाला बालाकोटमध्ये ३०० मोबाईल सुरू असलेले समजतात. मग, तुमच्या नाकाखाली कोणीतरी ५० किलो आरडीएक्स पुलवामामध्ये घेऊन आल्याचे कसे समजले नाही? पुलवामा हल्ल्यावेळी'बीफ बिर्याणी' खाऊन झोपला होतात का,' असा प्रश्न ओवेसी यांनी विचारला आहे. मात्र, त्यांच्या 'बीफ बिर्याणी' या शब्दावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ओवेसींना हैद्राबादमधील लोकसभा निवडणुकांविषयी विचारले असता, त्यांनी धर्मनिरपेक्षतेविरोधात उभे ठाकलेल्यांविरुद्ध आपण लढणार असल्याचे सांगितले. या बाबतीत भाजप आणि काँग्रेस वेगळे नाहीत, असे ते म्हणाले.

'कोणी भारतातराष्ट्रीय पातळीवर २ राजकीय पक्ष असल्याचे म्हणत असेल, तर मी त्याला नाही म्हणेन. भारतात एक राष्ट्रीय पक्ष आहे तो भाजप आणि दुसरा '१.५ भाजप' म्हणजे काँग्रेस. भाजप आणि काँग्रेसमध्ये फारसा फरक नाही,' असे ओवेसी म्हणाले.

Intro:Body:

पुलवामा हल्ल्यावेळी 'बीफ बिर्याणी' खाऊन झोपला होतात का, ओवेसींचा मोदींवर हल्ला

हैद्राबाद - एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. 'पुलवामा हल्ल्यावेळी 'बीफ बिर्याणी' खाऊन झोपला होतात का,' असा सवाल त्यांनी केला आहे.

'भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये बॉम्ब टाकले. यानंतर अमित शाह यांनी २५० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगितले. तर, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एनटीआरओने या परिसरात ३०० मोबाईल फोन सुरू असल्याचे सांगितले. तुम्हाला बालाकोटमध्ये ३०० मोबाईल सुरू असलेले समजतात. मग, तुमच्या नाकाखाली कोणीतरी ५० किलो आरडीएक्स पुलवामामध्ये घेऊन आल्याचे कसे समजले नाही,' असा प्रश्न ओवेसी यांनी विचारला आहे. मात्र, त्यांच्या 'बीफ बिर्याणी' या शब्दावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ओवेसींना हैद्राबादमधील लोकसभा निवडणुकांविषयी विचारले असता, त्यांनी धर्मनिरपेक्षतेविरोधात उभे ठाकलेल्यांविरुद्ध आपण लढणार असल्याचे सांगितले. या बाबतीत भाजप आणि काँग्रेस वेगळे नाहीत, असे ते म्हणाले.

'कोणी भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर २ राजकीय पक्ष असल्याचे म्हणत असेल, तर मी त्याला नाही म्हणेन. भारतात एक राष्ट्रीय पक्ष आहे तो भाजप आणि दुसरा '१.५ भाजप' म्हणजे काँग्रेस. भाजप आणि काँग्रेसमध्ये फारसा फरक नाही,' असे ओवेसी म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.