सुरत (गुजरात) - कोरोना महामारीमुळे गुजरातच्या सुरत येथील प्रसिद्ध डायमंड ज्वेलरी उद्योग बंद पडला होता. आता मात्र नविन अटी आणि शर्तीनुसार हे उद्योग पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट परिषदेचे चेअरमन दिनेश नावदिया यांनी दिली. गुजरातमधील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरत येथे पार पडलेल्या उद्योगपतींच्या बैठकीमध्ये डायमंड उद्योग बंद ठेवण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. मात्र, पुन्हा काही अटी आणि शर्ती लावून हा उद्योग सुरू ठेवू शकत येईल. यावर सर्वांनी शिक्कामोर्तब केले, असे नावदिया यांनी सांगितले. असे असले तरी महिंधरपुरा, चोक्सी बाजार आणि मिनी बाजार हे मुख्य डायमंड मार्केट शनिवारी आणि रविवारी बंद राहणार आहेत.