ETV Bharat / bharat

‘बोइंग ७३७’ तपासणी रडारवर ; सुरक्षेच्या कारणास्तव डीजीसीएच्या सूचना

नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) हवाई सेवा देणार्‍या भारतीय कंपन्यांना त्यांच्या बोइंग 737 विमानांच्या इंजिनची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारतात सध्या स्पाइसजेट, इंडिया एक्सप्रेस आणि विस्ताराच्या ताफ्यात ही विमाने आहेत.

author img

By

Published : Jul 25, 2020, 9:21 AM IST

डीजीसीए
डीजीसीए

नवी दिल्ली - नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) हवाई सेवा देणार्‍या भारतीय कंपन्यांना त्यांच्या बोइंग 737 विमानांच्या इंजिनची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणात अमेरिकेच्या संघीय विमानन प्रशासनाने (एफएए) जारी केलेल्या आपत्कालीन निर्देशानंतर डीजीसीएने हे पाऊल उचलले आहे. भारतात सध्या स्पाइसजेट, इंडिया एक्सप्रेस आणि विस्ताराच्या ताफ्यात ही विमाने आहेत.

अमेरिकेच्या संघीय विमानन प्रशासनाने काही बी-737 मॉडेल विमानांच्या इंजिनमध्ये खराबी आढळल्यानंतर हे निर्देश जारी केले आहेत. 737 क्लासिक (सीरीज 300-500) आणि 737-एस (सीरीज 600-900) विमान चालवणाऱ्या कंपन्यांना इंजिनमधील खराबी तपासण्यासाठी सांगितले गेले आहे. कोरोनामुळे विमान सेवा ठप्प होती. त्यामुळे इंजिनमधील वाल्व गंजण्याची शक्यता जास्त आहे, असे बोइंगने म्हटले आहे.

बोइंग 737 मॅक्स-8 विमान क्रॅश झाल्यानंतर भारतामध्ये गेल्या वर्षी मार्चमध्ये या विमानांची तपासणी करण्यात आली होती. इंजिन बंद पडून अपघात होतो, असे प्राथमिक कारण याआधीच्या अपघातांच्या तपासात समोर आले होते. तसेच आॅक्टोबर 2018 मध्ये इंडोनेशियामध्ये लायन एअरचे बोइंग 737 मॅक्स-8 विमान पडले होते, त्या वेळी 180 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.