पटना - २५ एप्रिल १९३४ला गांधीजी बिहारच्या 'देवघर'मधील बाबाधाम मंदिराला भेट देण्यास निघाले होते. त्याचवेळी, गांधीजी दलितांना मंदिरात प्रवेश देणार आहेत हे समजल्यावर, पंडा समाजाच्या काही लोकांनी त्यांना प्रचंड विरोध केला. त्यामुळे गांधीजींना अर्ध्या रस्त्यातूनच माघारी जावे लागले होते.
गांधी १५० : या गावात झाला होता गांधीजींना विरोध.. महात्मा गांधी हे शिव मंदिरात जाण्यासाठी जसिदिह रेल्वे स्थानकावर उतरले होते. त्याचवेळी पंडा समाजाच्या काही लोकांनी, गांधीजींचा मार्ग अडवत त्यांच्यावर दगडफेक सुरु केली. यावेळी गांधीजींना मंदिरात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला. मात्र, आचार्य विनोबा भावे यांना मात्र दर्शनाची परवानगी देण्यात आली होती. गांधीजींची दर्शनाची इच्छा अपुरी राहिली. मात्र त्यानंतर, बिजली कोठी येथे त्यांनी नाथमल सिंघानिया यांची भेट घेतली. सिंघानिया यांनी त्यावेळी स्वातंत्र्य लढ्यासाठी बापूंना आर्थिक मदत केली. बाबाधाममध्ये दलितांना प्रवेश मिळवून देणे गांधीजींना शक्य झाले नाही. मात्र, गांधीजींच्या प्रयत्नाने देवघरमध्ये विचारांची ठिणगी पडली. आजही, देवघरच्या टॉवर चौकात उभा असलेला गांधीजींचा पुतळा लोकांना त्याग आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्यास प्रेरित करतो.हेही पहा : ...या ठिकाणी महात्मा गांधी यांच्यावर झाला होता जीवघेणा हल्ला