ETV Bharat / bharat

धोनी कुटूंबाला टोलर्संकडून धमक्यानंतर रांचीत वातावरण तापले, युवा खेळाडूंचे आंदोलन

महेंद्रसिंह धोनीसह परिवाराला सोशल मीडियावरून धमक्या मिळाल्यानंतर राजधानी वातावरण तापले आहे. राज्यातील युवा क्रिकेटर सत्यम राय यांच्या नेतृत्वात शहरातील मुख्य चौकात निदर्शन करण्यात आले आहे.

सत्यम राय
सत्यम राय
author img

By

Published : Oct 11, 2020, 8:32 PM IST

रांची - चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. यानंतर सोशल मीडियावर धोनीला अनेक धमक्या देण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर झारखंडमधील युवा क्रिकेटर सत्यम राय यांच्या नेतृत्वात शहरातील अल्बर्ट एक्का चौकात विरोध प्रदर्शन करण्यात आले. यासह आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांना अटक करत कारवाईची मागणी केली आहे.

खेळाडुंचे निदर्शन

काय आहे प्रकरण -

कोलकाता नाइट रायडर्सने दिलेल्या १६८ धावांचा पाठलाग करताना १० धावांच्या फरकाने चेन्नईला पराभव स्विकारावा लागला. यानंतर कर्णधार धोनीसह इतर फलदांजांना चाहत्याच्या रोषाला सामोरे जावे लागले. यातच काहींनी तर धोनीसह त्याची पत्नी साक्षी आणि मुलीवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्या. या घटनेसंदर्भात सोशल मीडियावरच अनेक लोकांनी रोष व्यक्त केला आहे.

राजधानी संतप्त प्रतिसाद -

या घटनेचे राजधानीत मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले. धोनीच्या चाहत्यांनी या घटनेसंदर्भात दोषींच्या अटकेसह कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, शहरातील अल्बर्ट एक्का चौकात युवा खेळाडूंनी एकत्र येत, निदर्शन केली. 'खेळाडुंचा सन्मान करा' या मथळ्याचे पोस्टर दाखवत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली.

हेही वाचा - 'मंदिरे सुरू करा म्हणायला तुम्हाला काय? जबाबदारी आमच्यावर आहे...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.