ETV Bharat / bharat

दिल्ली हिंसाचार : मृतांचा आकडा ४५ वर ; १६७ गुन्हे दाखल तर ८८५ जण ताब्यात - सीएए हिंसाचार दिल्ली

अवैध शस्त्रास्त्रे ताब्यात घेण्यासाठी पोलीस अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. अनेकांना शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी अटकही करण्यातही आली आहे. अफवा पसरवू नका, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

delhi violence
दिल्ली हिंसाचार
author img

By

Published : Mar 1, 2020, 8:32 AM IST

नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारातील मृतांचा आकडा वाढून ४५ झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आत्तापर्यंत १६७ गुन्हे दाखल केले आहेत तर, ८८५ जणांना ताब्यात घेतले आहे. परिस्थिती आता नियंत्रणात आली असली तरी संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष तपास पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

अवैध शस्त्रास्त्रे ताब्यात घेण्यासाठी पोलीस अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. अनेकांना शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी अटकही करण्यातही आली आहे. शस्त्र बाळगल्याप्रकरणी आत्तापर्यंत ३६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व क्षेत्रात आता शांतता आहे. शनिवारी हिंसेसंबधी पोलिसांना एकही फोन आला नाही, असे दिल्ली पोलीस विभागाचे प्रवक्ते मनदीप सिंग रंधावा यांनी सांगितले.

सोशल मीडियासंबंधी १३ गुन्हे दाखल

सोशल मीडियातून समाजात द्वेष आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्विटर, फेसबुक, इस्टाग्राम व्हॉटस अ‌ॅपवरून चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हिंसाचारानंतर पोलीस सोशल मीडियावरही लक्ष ठेवून आहे. अफवा पसरवू नका, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.