नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचारात मृतांचा आकडा वाढून ३८ झाला आहे. पोलीस आणि निमलष्करी दलाकडून हिंसाग्रस्त परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. तीन दिवस चाललेल्या हिंसाचारात २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
सर्वात जास्त हिंसा सोमवारी आणि मंगळवारी झाली. ईशान्य दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आली असून आज कुठेही हिंसाचाराची घटना घडली नाही. संवेदनशील भागांमध्ये पोलीस 'फ्लॅग मार्च' करत आहेत. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थिती नियंत्रणात आली असून नागरिकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ईशान्य दिल्लीतील अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कडेकोट बंदोबस्त संवेदनशील भागांमध्ये ठेवण्यात आला आहे. सीएए समर्थक आणि सीएएला विरोध करणाऱ्या नागरिकांमध्ये २३ फेब्रुवारी रोजी हिंसाचार पसरला होता.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचार : नाल्यात सापडले दोन मृतदेह; मृतांचा आकडा ३३ वर