नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिन दिल्लीसह देशभरामध्ये आज उत्साहात साजरा केला जात आहे. दिल्लीतील शाहीन बागमध्ये तिरंगा डौलात फडकला आहे. गेल्या दीड महिन्यापासून शाहीन बागमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहेत. सकाळी 9.30 ते 10 दरम्यान तब्बल 10 लोकांनी 'जन गण मन' गायले.
-
Delhi: The tricolour unfurled at Shaheen Bagh, on #RepublicDay today. pic.twitter.com/6kEVz4iAQu
— ANI (@ANI) 26 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi: The tricolour unfurled at Shaheen Bagh, on #RepublicDay today. pic.twitter.com/6kEVz4iAQu
— ANI (@ANI) 26 January 2020Delhi: The tricolour unfurled at Shaheen Bagh, on #RepublicDay today. pic.twitter.com/6kEVz4iAQu
— ANI (@ANI) 26 January 2020
हेही वाचा - Republic Day 2020: प्रजासत्ताक दिनाचा देशभर उत्साह.. राजपथावर संस्कृती आणि सामर्थ्यांचे दर्शन
या आंदोनलात आतापर्यंत कन्हैय्या कुमार, सीताराम येचुरी, शशी थरुर, मणिशंकर अय्यर यासारखे नेते इथे हजेरी लावून गेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. या महिला सर्व वयोगटातल्या आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा, एनसीआर रद्द करण्यात यावा अशी मागणी या महिलांनी केली आहे.
हेही वाचा - 'केजरीवालांनी दिल्लीला विषारी बनविले'