ETV Bharat / bharat

प्रतिबंधित सीमी संघटनेच्या सदस्याला १९ वर्षानंतर अटक, दिल्ली पोलिसांची कामगिरी

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने बंदी घालण्यात आलेल्या सीमी संघटनेच्या सदस्याला अटक केली आहे. मागील १९ वर्षांपासून आरोपी फरार होता. अब्दुल्लाह दानिश असे या आरोपीचे नाव आहे.

सीमी संघटनेच्या सदस्याला अटक
सीमी संघटनेच्या सदस्याला अटक
author img

By

Published : Dec 6, 2020, 7:16 PM IST

Updated : Dec 6, 2020, 8:02 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने बंदी घालण्यात आलेल्या सीमी संघटनेच्या सदस्याला अटक केली आहे. मागील १९ वर्षांपासून आरोपी फरार होता. अब्दुल्लाह दानिश असे या आरोपीचे नाव आहे. सापळा रचून पोलिसांनी त्याला दिल्लीतून अटक केली.

कशी झाली अटक

सीमी संघटनेच्या सदस्याला अटक

पोलीस उपायुक्त अतर सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली एक पथक सतत आरोपीचा शोध घेत होते. आरोपीची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या हालचालींवर सातत्याने नजर ठेवण्यात येत होती. ५ डिसेंबरला आरोपी दिल्लीतील झाकीर नगर भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांना सापळा रचून आरोपीला अटक केली.

सीमी संघटनेला भारतात बंदी घातल्यानंतर २७ सप्टेंबर २००१ रोजी संघटनेचे सदस्य पत्रकार परिषद घेत असताना पोलिसांनी छापा मारला होता. त्यावेळी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले होती. पोलिसांना आक्षेपार्ह सामानाही सापडले होते. तेव्हापासून अब्दुल्लाह फरार होता. आता त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सीमी संघटनेत करत होता भरती

आरोपी अब्दुल्लाह दानिश सीमी संघटनचा सक्रिय सदस्य होता. अनेक युवकांची त्याने संघटनेत भरती केली होती. झाकिर नगर येथील संघटनेच्या कार्यालयात तो राहत त्याची राहण्याची व्यवस्था होती. २००१ साली पोलिसांनी छापा टाकला असता तो फरार झाला होता. त्यानंतर मागील १९ वर्षांपासून तो भूमिगत होता.

Last Updated : Dec 6, 2020, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.