ETV Bharat / bharat

वडिलांच्या अंत्यविधीसाठी मागितलेला जामीन न्यायालयाने फेटाळला; कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्णय - जामीन अर्ज

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने वडिलांच्या अंत्यविधीसाठी जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा निर्णय घेतला.

Delhi High Court
दिल्ली उच्च न्यायालय
author img

By

Published : Apr 17, 2020, 9:47 AM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कैद्यांना जामीन देण्यात आला आहे. मात्र, काही गुन्हेगारांना न्यायालयाने जामीन नाकारला आहे. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने वडिलांच्या अंत्यविधीसाठी जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. आरोपी तुरुंगाच्या बाहेर गेल्यानंतर अनेकांच्या संपर्कात येईल. पुन्हा तो तुरुंगात आल्यानंतर येथेही कैद्यांच्या संपर्कात येईल, यातून कोरोना संसर्ग होण्याचा मोठा धोका असे न्यायाधीश रजनीश भटनागर यांनी म्हटले.

आरोपी राकेश कुमार याचे घर दिल्लीपासून ८०० किमी दूर आहे. हा प्रवास आणि सध्याची कोरोनाची पार्श्वभूमी बघता त्याचे तुरुंगातून बाहेर जाणे धोकादायक आहे, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.

आरोपीचे म्हणणे आहे, की ९ एप्रिलला उत्तरप्रदेशातील कुरवा गावात नदीमध्ये बुडून त्याच्या वडिलांचे निधन झाले. मात्र, अद्याप त्याच्या वडिलांचा मृतदेह सापडल्याचा काही पुरावा त्याने सादर केलेला नाही, त्यामुळे या घटनेवर विश्वास ठेवणे जिकरीचे आहे.

आरोपी राकेश कुमारवर २०१४ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मागील सहा वर्षांपासून तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आरोपीच्या जामीन अर्जाला पोलिसांनी विरोध दर्शवला होता. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार हा गंभीर गुन्हा आहे. आरोपीला जामीन देणे धोकादायक आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.