ETV Bharat / bharat

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 1971 युद्धात भाग घेतलेल्या जवानाला जामीन मंजूर

तुरुंगामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण असल्याचे मत न्यायमूर्ती ब्रिजेश सेठी यांनी नोंदविले. त्यानुसार कोरोनाची परिस्थिती पाहता याचिकाकर्त्याला जामीन मंजूर केला आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 25, 2020, 7:14 PM IST

नवी दिल्ली - 1971च्या युद्धात भाग घेतलेल्या मात्र, आता एका दिवाणी खटल्यात तुरुंगात असलेल्या निवृत्त जवानाला दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. एका दिवाणी खटल्यात त्यांना तुरुगंवास झाला होता. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

तुरुंगामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण असल्याचे मत न्यायमूर्ती ब्रिजेश सेठी यांनी नोंदविले. त्यानुसार कोरोनाची परिस्थिती पाहता याचिकाकर्त्याला जामीन मंजूर केला आहे. खटला दिवाणी प्रकारचा असल्याचे याचिकाकर्त्याच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिले. वकील एम. के. घोष आणि टीना गर्ग यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडली.

तसेच या खटल्यातील तक्रारदार आणि याचिकाकर्ते शेजारी राहणारे आहेत. त्यामुळे दोघांमधील वाद सामंज्यस्याने मिटविता येऊ शकतो, असे मत न्यायालयाने नोंदविले.

15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर 45 दिवसांचा अंतरिम जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. याचिकाकर्त्याने 1971 च्या युद्धात भाग घेतला होता. या युद्धात त्यांनी अभिमानाने मातृभूमीची सेवा केली आहे. मात्र, आता ते तणावग्रस्त असून त्यांना जामीन मिळावा, असे याचिकेत म्हटले होते. याचिकाकर्त्याने अनेक राजदुतांना आणि उच्चआयुक्तांच्या संरक्षणाची जबाबदारीही स्वीकारली होती. मात्र, ते निवृत्त झाले असून ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना जामीन मिळावा अशी बाजू वकिलांनी मांडली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.