ETV Bharat / bharat

शीला दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्लीत २ दिवसीय राजकीय दुखवटा जाहीर

शीला दीक्षित यांच्या निधनानंतर राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तर, दिल्ली सरकारने २ दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

author img

By

Published : Jul 20, 2019, 7:53 PM IST

शीला दीक्षित यांचे निधन

नवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे आज (शनिवार) फोर्टीस रुग्णालयात वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. शीला दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्ली सरकारने २ दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

दिल्लीचे उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शीला दीक्षित यांच्या निधनामुळे राज्यात २ दिवसीय दुखवटा जाहीर केला आहे. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे आज ३ वाजून ५५ मिनिटाच्या सुमारास निधन झाले. त्यांचे पार्थिव सध्या निजामुद्दीन येथील त्यांच्या घरी ठेवण्यात आले आहे. उद्या बोध घाटावर अडीच वाजण्याच्या सुमारात पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

शीला दीक्षित यांचा जन्म ३१ मार्च १९३८ ला पंजाबमधील कपूरथळा येथे झाला होता. शीला दीक्षित यांनी नवी दिल्लीतून कॉन्वेंट ऑफ जीजस अॅन्ड मेरी स्कूल येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. तर, मिरांडा हाऊस येथून कला शाखेतून शिक्षण घेताना इतिहास विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शीला दीक्षित यांचा विवाह प्रसिद्ध स्वातंत्र सैनिक आणि माजी राज्यपाल उमाशंकर दीक्षित यांच्या कुटुंबात झाला. शीला दीक्षित यांचे पति स्व. विनोद दीक्षित भारतीय प्रशासकीय सेवेत होते. शीला दीक्षित यांना १ मुलगा आणि १ मुलगी आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री होण्यापूर्वी शीला दीक्षित यांनी १९८६ ते १९८९ या काळात केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले होते. शीला दीक्षित १९८३ साली कन्नौज, उत्तरप्रदेश येथून खासदार म्हणून निवडुन आल्या होत्या. दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळल्यानंतर त्यांनी १९९८ साली पक्षाला विजय मिळवून दिला. यानंतर, त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. शीला दीक्षित सलग ३ वेळा मुख्यमंत्री झाल्या. मुख्यमंत्रीपद सलग ३ वेळा भूषवणाऱ्या शीला दीक्षित देशातील पहिल्या महिला आहेत. दिल्लीत २००८ साली झालेल्या निवडणुकीत शीला दीक्षित यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ७० पैकी ४३ जागा जिंकल्या होत्या. २०१३ साली झालेल्या निवडणुकीत पराभवानंतर शीला दीक्षित यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.