ETV Bharat / bharat

दिल्ली निवडणूक : भाजपचे 'संकल्प पत्र'.. गरीबांना 2 रुपये प्रति किलो दराने मिळणार गव्हाचे पीठ

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली आहे.  शुक्रवारी ‘संकल्प पत्र’ या नावाने भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

author img

By

Published : Jan 31, 2020, 5:00 PM IST

दिल्ली निवडणूक
दिल्ली निवडणूक

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली आहे. शुक्रवारी ‘संकल्प पत्र’ या नावाने भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या वेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी उपस्थितीत होते. गरिबांना 2 रुपये प्रती किलो पीठ तर महाविद्यालयात जाणाऱया विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी देण्याचे आश्वासन भाजपने आपल्या जाहिरनाम्यात दिले आहे.

  • केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी व भाजपा के अन्य वरिष्ठ नेता दिल्ली विधानसभा चुनाव 2020 के लिए 'संकल्प पत्र' जारी करते हुए। #DeshBadlaDilliBadlo pic.twitter.com/vjhbTlIlPE

    — BJP Delhi (@BJP4Delhi) January 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संपूर्ण देश हा दिल्लीशी जोडलेला आहे. भाजप नेत्यांनी संधी मिळाली तेव्हा त्यांनी दिल्लीचे भविष्य बदलले आहे. दिल्लीत पिण्याच्या पाण्याची समस्या अतिशय गंभीर आहे. लखवाड या बहुउद्देशीय प्रकल्पासाठी 1970 पासून दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये वाद सुरू होता. 2018 मध्ये हा वाद सोडवण्यात भाजपला यश आले. जर हा प्रकल्प हिमाचल प्रदेशमध्ये पूर्ण झाला तर संपुर्ण दिल्लीला येत्या 2070 पर्यंत पिण्याच्या पाण्याची समस्या होणार नाही, असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले.

DelhiElections2020
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध...

भाजपच्या जाहिरनाम्यातून...

  • भाजप आपल्या 5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये कमीत-कमी 10 लाख बरोजगार लोकांना रोजगार देण्यात येईल.
  • गरीबांना 2 रुपये प्रती किलो पीठ.
  • महाविद्यालयात जाणाऱया विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी देण्यात येणार.
  • 10 कोटी रुपयांच्या तरतुदीसह नवीन 'समृद्धी दिल्ली पायाभूत सुविधा योजना' सुरू करणार.
  • दिल्लीमध्ये 200 नव्या शाळा आणि नवे 10 महाविद्यालय सुरू करण्यात येतील.
    DelhiElections2020
    गरीबांना मिळणार 2 रुपये प्रति किलो पीठ
  • सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी दिल्लीतील रुग्णालय, सरकारी शाळा आणि इतर सर्व सरकारी संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचार्‍यांना 58 वर्षे नोकरीची हमी देण्यात येईल.
  • दिल्लीसाठी नवे क्रीडा धोरण तयार करण्यात येईल.
  • यमुना आणि आसपासचा परिसर स्वच्छ आणि विकसित करण्यासाठी दिल्ली यमुना विकास मंडळ स्थापन केले जाईल.
  • दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जाईल. तसेच व्यापार आणि उद्योगास प्रोत्साहन देण्यात येईल.
  • गरीब विधवा महिलांच्या मुलीच्या लग्नावर सरकार 51 हजार रुपयांची खास भेट देईल.
    DelhiElections2020
    गरीब विधवा महिलांच्या मुलीच्या लग्नावर सरकार 51 हजार रुपयांची खास भेट देईल.

Intro:Body:

दिल्ली निवडणूक : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध,

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली आहे.  भाजपने शुक्रवारी आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.