ETV Bharat / bharat

पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 104 जणांचा मृत्यू

पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या 104 झाली आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पंजाब
पंजाब
author img

By

Published : Aug 3, 2020, 7:49 AM IST

नवी दिल्ली - पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या 104 झाली आहे. तरन तारन जिल्ह्यात रविवारी पुन्हा 12 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या तरन तारन जिल्ह्यात आतापर्यंत 75 जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती उपायुक्त कुलवंत सिंह यांनी दिली. दरम्यान, पीडित व्यक्तींचे नातेवाईक आपले जबाब देण्यास पुढे येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. काही कुटुंबियांनी तर पोलिसांना कळवण्यापूर्वीच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी यापूर्वीच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी एसआयटीही गठीत करण्यात येत आहे. विषारी दारु प्रकरणात तरन तारनच्या एसएसपींनी कारवाई करत दोन पोलीस ठाण्यांचे प्रभारी आणि एका डीएसपीला निलंबित केले आहे. तसेच पोलीस सातत्याने विविध ठिकाणी छापे टाकत आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंजाबमधील अमृतसर, बाटला आणि तरनतारन या तीन जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री विषारी दारु प्यायल्याने 21 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. विरोधी पक्षाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अकाली दलने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.