नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारातील बळींच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत या हिंसाचारामुळे एकूण ५३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीच्या गुरू तेजबहादूर (जीटीबी) रुग्णालयात ४४, लोक नायक रुग्णालयात ३, राम मनोहर लोहिया रुग्णालयात पाच, तर जग परवेश चंदेर रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार या हिंसाचारात ४७ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात आता वाढ झाली आहे.
दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत ३६९ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच १,२८४ लोकांना ताब्यातही घेतले आहे. यासोबतच दिल्ली पोलिसांनी १६ हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध केले आहेत.
२४ फेब्रुवारीला सीएए समर्थक आणि आणि विरोधकांमध्ये झालेल्या दंगलीने लवकरच भीषण स्वरूप धारण केले होते. यानंतर तीन दिवस ईशान्य दिल्लीमध्ये हिंसाचार सुरू होता. या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेशन विभागाने दोन विशेष पथके तैनात केली आहेत.
हेही वाचा : कोरोनाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची ५० अब्ज डॉलरची मदत