ETV Bharat / bharat

'सरकारच्या एकाही मंत्र्यांमध्ये 'मोदी तुम्ही चुकताय,' असं सांगण्याची हिंमत नाही!'

author img

By

Published : Sep 20, 2020, 7:56 PM IST

Updated : Sep 20, 2020, 8:32 PM IST

खासदार डीएमके पक्षाचे नेते दयानिधी मारन यांनी देशातील सद्यस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच 'आताच्या कॅबिनेटमधील एकाही मंत्र्यामध्ये 'मोदी तुम्ही चुकताय,' असं सांगण्याची हिंमत नाही, असे ते म्हणाले.

दयानिधी मारन
दयानिधी मारन

नवी दिल्ली - सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात खासदार डीएमके पक्षाचे नेते दयानिधी मारन यांनी देशातील सद्यस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच 'आताच्या कॅबिनेटमधील एकाही मंत्र्यामध्ये 'मोदी तुम्ही चुकताय,' असं सांगण्याची हिंमत नाही, असे ते म्हणाले. मोदीच्या रात्री 8 वाजता येऊन घोषणा करण्याच्या सवयीने लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. तसेच, मोदींनी अचानक लॉकडाऊन लागू केले. मात्र, लॉकडाऊन काळात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजनाही सरकारने केल्या नाहीत, असे ते म्हणाले.

'पहिल्या कोरोना रुग्णांची नोंद 3 फेब्रुवारीला झाली. तेव्हा आपण जागे व्हायला हवे होते. सीमा बंद करायला हव्या होत्या, चाचणी सुरू करायला हवी होती. मात्र, त्यावेळी मोदीजी नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात व्यस्त होते. जेव्हा कोरोनाचे संक्रमण पसरण्यास सुरुवात झाली, तेव्हा एका कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र आले. तसेच, कोरोनाचे संक्रमण रोखण्याची वेळ आली. तेव्हा मध्य प्रदेशमधील सरकार कोसळले आणि राजकीय घडामोडींना वेग आला. मोदींच्या निष्काळजीपणाच्या स्वभावामुळे कोरोनाचे भारतामध्ये संक्रमण पसरले, अशी टीका दयानिधी मारन यांनी केली.

पंतप्रधान मोदी यांनी 24 मार्चला फक्त चार तासांच्या सूचनेवर 21 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली. त्या दिवसापासून देशात गोंधळ सुरू झाला. ते नेहमीच रात्री 8 वाजता येऊन, घोषणा करतात. 2016मध्ये त्यांनी नोटाबंदीची घोषणा करून लोकांना धक्का दिला. तसेच त्यांनी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली. याबाबत त्यांनी कुणाशीही चर्चा केली नाही. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये त्यांनी पुन्हा दिवे लावण्याचे आणि टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले. तेव्हा लोकांनी रस्त्यांवर उतरत कोरोनाच्या नियमांचे उल्लघंन करत, ढोल वाजवले आणि फटाके फो़डले, असेही ते म्हणाले.

कोरोना संकटात ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड आदी देशातील पंतप्रधान नागरिकांना दिलासा देण्याचे काम करत होते. तर, भारतामध्ये मोदी सरकारने खासदारांच्या पगारात 30 टक्के कपात केली, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, त्यामुळे देशातील कंपन्याकडे चुकीचा संदेश गेला आणि त्यांनी त्यांच्या कामगारांच्या पगारात 40 टक्के कपात केली. भारतामध्ये सर्वांत जास्त मध्यमवर्गीय लोक राहतात, ज्यांचे रोजंदारीवर घर चालते. त्यांना याचा फटका बसला, असेही ते म्हणाले.

Last Updated : Sep 20, 2020, 8:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.