तिकीट मिळूनही भाजपचे गिरिराज सिंह दिल्ली दरबारी; राजकीय वर्तुळात 'ही' चर्चा
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. मात्र, भाजप एका जागी फसलेली दिसते. बिहारच्या बेगुसराय येथून ज्या नेत्याला भाजपने उमेदवारी दिली तो नेताच येथून लढण्यास तयार नाही. याबद्दल त्या नेत्याने पक्षाकडे आपली नाराजीही जाहीर केली आहे. वाचा सविस्तर
एअर इंडियाच्या बोर्डिंग पासवर पंतप्रधान मोदींचे छायाचित्र; आचारसंहिता भंगाचा मुद्दा ऐरणीवर
तप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे छायाचित्र असलेल्या बोर्डिंग पास जारी केल्यामुळे एअर इंडियावर टीका होत आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे तिकिटावर असलेल्या पंतप्रधानांच्या फोटोमुळेही वादंग निर्माण झाले होते. बोर्डिंग पास आदर्श आचारसंहितेचा भंग करताना आढळल्यास परत घेण्यात येतील, असे एअरलाईन्सकडून सांगण्यात आले आहे. वाचा सविस्तर
काँग्रेस देशातील गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देणार - राहुल गांधी
देशातील २० टक्के सर्वात गरीब कुटुंबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. काँग्रेस केंद्रीय समितीच्या बैठकीमध्ये निर्णय घेतल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी ही घोषणा केली. या योजनेमुळे देशभरातील ५ कोटी कुटुंबांना याचा फायदा होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. वाचा सविस्तर
चौकीदार चोरच नाही तर खूनी, भ्रष्टाचारी आणि बलात्कारी - फिरदौस टाक
पीडीपीचे नेते फिरदौस टाक यांनी भाजपच्या चौकीदार मोहिमेवर हल्लाबोल केला. देशाला अनेक लोक लुटून गेले त्यामुळे चौकीदार चोर असल्याचे टाक यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनीही टि्वटरवर 'चौकीदार नरेंद्र मोदी' असे नामकरण केले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना फिरदौस यांनी टीका केली आहे. वाचा सविस्तर
गंगा यात्रेनंतर आता प्रियंकांची अयोध्येत ट्रेन यात्रा, भाजपला काय नुकसान?
प्रियंका गांधींनी नुकतीच गंगा यात्रा केली. यादरम्यान त्यांनी अनेक लोकांशी संपर्क साधला. आता प्रियंका रेल्वे यात्रा करत राज्यात संपर्क अभियान राबवणार आहेत. प्रियंका गांधी २७ मार्चला दिल्ली ते फैजाबाद रेल्वेयात्रा करणार आहेत. यावेळी त्या सर्व मतदारसंघातील लोकांशी संवाद साधतील. अयोध्येमध्ये प्रियंका 'रोड शो' करणार आहेत. प्रियंकांमुळे भाजपला काय नुकसान होईल? वाचा सविस्तर
सपना चौधरी करणार भाजपमध्ये प्रवेश? मनोज तिवारींसोबतच्या फोटोने चर्चांना उधाण -
डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आहे. सपना लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत होत्या. मात्र, रविवारी पत्रकार परिषद घेत सपनाने हे वृत्त फेटाळून लावले. यानंतर आता तिच्या भाजप प्रवेशाविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. वाचा सविस्तर
आयएनएक्स मीडियाप्रकरणी आरोप असलेल्या कार्ती चिदंबरम यांना काँग्रेसकडून उमेदवारी -
काँग्रेसने आज लोकसभेच्या १० उमेदवारांची ९वी यादी जाहीर केली आहे. यामध्ये माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कार्ती चिदंबरम यांच्यावर अनेक आरोप आहेत. 'आयएनएक्स मीडिया' केसप्रकरणी कार्ती यांची चौकशी सुरू आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात कार्ती यांच्यावर लाचखोरीचा आरोप आहे. वाचा सविस्तर
जगन मोहन रेड्डी हे 'तुळशीच्या बागे'तले 'गांजाचे रोपटे'; चंद्राबाबूंचे वक्तव्य -
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वाय. एस. जगन मोहन रेड्डी हे 'तुळशीच्या बागे'तले 'गांजाचे रोपटे' असल्याची टीका केली. येत्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर नायडून यांनी रविवारी हे वक्तव्य केले. वाचा सविस्तर
लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे कमल हसन यांचे स्पष्टिकरण -
अभिनेता- राजकारणी कमल हसन यांनी आज लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यांच्या मक्कल निधी मय्यम (एमएनएम) या पक्षाचे घोषणापत्र आणि उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध करताना त्यांनी ही माहिती दिली. 'सर्व उमेदवार माझेच चेहरे आहेत. मला रथात बसण्यापेक्षा रथ ओढण्यात अधिक रस आहे,' असे ते म्हणाले. वाचा सविस्तर