नवी दिल्ली - भारतीय वायूदलाने ८३ तेजस लढाऊ विमान मिळणार आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषद (डीएसी) च्या पहिल्या बैठकीत विमानाच्या अधिग्रहणाला मान्यता देण्यात आली आहे.
डीआरडीओची एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीसह(एडीए) तेजसच्या नौदल विविध आवृत्ती विकसित करत आहे. आयएएफने हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) 40 तेजस विमानांची ऑर्डर दिली आहे. 2018 मध्ये, एएएफने आणखी 83 तेजस विमानांची मागणी केली होती. या विमानांची किंमत 50,000 कोटी असणार आहे. या विमानांमध्ये अत्याधुनिक हवाई उपकरणे आणि रडारचा समावेश असेल.
१९८०च्या दशकात स्वदेशी बनावटीच्या, वजनाने हलक्या लढाऊ विमानाच्या (लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट – एलसीए) निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यातून तेजस हे स्वदेशी लढाऊ विमान आकारास आले होते
नुकतचं तेजस विमानाच्या नौदल आवृत्तीने 11 जानेवारी आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू जहाजावर यशस्वी लँडींग केले होते. ही घटना लढाऊ विमानांच्या विकासामध्ये मैलाचा दगड मानली गेली होती. या विमानाच्या यशस्वी चाचणीमुळे भारताला निवडक राष्ट्रांच्या यादीत स्थान मिळाले आहे.