नवी दिल्ली - ओडिशानंतर फनी चक्रीवादळ आज (शनिवार) पश्चिम बंगालमध्ये धडकले आहे. पश्चिम बंगालमध्ये वादळाची तीव्रता ओडिशापेक्षा कमी झाली आहे. ताशी ९० किलोमीटरच्या वेगाने फनी वादळ पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहे.
फनी चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या वादळामुळे पश्चिम बंगालमधील जनजीवन विस्कळीत झाले असून रेल्वे, विमानसेवा ठप्प झाल्या आहेत.
रेल्वे, विमानसेवेवर परिणाम -
चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. तसेच तब्बल २२० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.