ETV Bharat / bharat

आज रात्री ९ वाजता ठरणार नवीन काँग्रेस अध्यक्ष? - राहुल गांधी राजीनामा

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु झाली आहे. यावेळी नव्या अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक
author img

By

Published : Aug 10, 2019, 11:59 AM IST

Updated : Aug 10, 2019, 2:02 PM IST

नवी दिल्ली- राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. आज (शनिवार) काँग्रेस कार्यकारीणीची बैठक झाली. काँग्रेस कार्यकारिणी आज संध्याकाळी ८.३० वाजता पुन्हा बैठक घेणार आहे. ९ वाजेपर्यंत नव्या अध्यक्षांचे नाव निश्चित करण्याची शक्यता आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी दिली. आता बैठक संपल्याचे त्यांनी सांगितले.

  • Adhir Ranjan Chaudhary after Congress Working Committee(CWC) meeting ends: We will meet again at 8.30 pm, it(name of new party chief) is expected to be finalized by 9 pm today itself pic.twitter.com/HC05bFke5v

    — ANI (@ANI) August 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सोनिया गांधी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमधून बाहेर पडल्या तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी आणि राहुल अध्यक्ष निवड करताना चर्चेत सहभाग घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

  • Sonia Gandhi on leaving from Congress Working Committee meeting: Now consultation(to decide next party chief) is going on and naturally me and Rahul ji cannot be a part of it pic.twitter.com/OcMoztJtuQ

राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. त्यांनी अध्यक्ष पदावर कायम रहावे, यासाठी पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत घातली होती. पक्षातील गोंधळाची स्थिती संपवण्यासाठी अध्यक्षाची निवड लवकरात लवकर झाली पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेस नेते शशी थरुर यांनी व्यक्त केले होते.

काँग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्ष पदासाठी मुकुल वासवनिक, मल्लिकार्जुन खरगे, अशोक गेहलोत, सुशीलकुमार शिंदे यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. यासह अनेक काँग्रेस नेते प्रियांका गांधी यांच्या निवडीसाठी आग्रही आहेत.

Intro:Body:

sdfsd

Conclusion:
Last Updated : Aug 10, 2019, 2:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.