नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या बडोही येथे गुरुवारी एका गटाने विद्यार्थी नेत्यावर गावठी बॉम्ब फेकल्याची घटना घडली. या हल्ल्यात विद्यार्थी नेत्यासह तिघांना किरकोळ दुखापत झाली.
गुरुवारी रात्री उशिरा दुचाकीस्वारांनी विद्यार्थी नेते मनीष यादव यांच्यावर देशी बनावटी बॉम्बने हल्ला केला. या घटनेने परिसरात घबराहट निर्माण झाली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी त्यांचा शोध सुरू आहे.
बुधवारी दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. गुरुवारी जोगिनका गावातील रहिवासी मनजित सिंग नावाच्या व्यक्तीने आपल्या सहकाऱयांसह यादव यांच्यावर बॉम्ब फेकला. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच अटक केली जाईल, असे पोलीस अधीक्षक रामबदन सिंह यांनी सांगितले.