नवी दिल्ली - केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) उपनिरीक्षकाने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला गोळया घातल्या. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडल्या. यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. लोधी इस्टेट भागात उपनिरीक्षकाने स्वत: ला ठार मारण्यापूर्वी वरिष्ठांना गोळ्या घालून ठार मारल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी शनिवारी केला.
शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना गृह मंत्रालयाकडून (एमएचए) देण्यात आलेल्या लोधी इस्टेट या बंगल्यात सुमारास घडली.
सब इन्स्पेक्टर कर्नेल सिंह (55) आणि वरिष्ठ निरीक्षक दशरथ सिंग ( 56) यांच्यात वाद झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की उपनिरीक्षकाने त्यांच्याकडील बंदुकीने निरीक्षकाचा खून केला आणि नंतर स्वत: ला गोळ्या घालून ठार केले.
कर्नेल सिंह हा जम्मू-काश्मीरमधील उधमपूरचा, तर निरीक्षक दशरथ सिंग हरियाणाच्या रोहतकचे रहिवासी होते. निमलष्करी दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेमागील कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.