ETV Bharat / bharat

कोरोना योद्धांचा बळी, 55 वर्षीय सीआरपीएफ जवानाचा कोरोनामुळे मृत्यू

राजधानी दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात 55 वर्षीय सीआरपीएफ जवानाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

CRPF personnel dies of COVID-19 in Delhi

author img

By

Published : Apr 29, 2020, 9:08 AM IST

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्याच्या संख्येत वाढ होत आहे. राजधानी दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात 55 वर्षीय सीआरपीएफ जवानाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मृत सीआरपीएफ जवान हे आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील रहिवास होते. काही दिवसांपूर्वी संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांना सफदरजंग रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रासही होता. केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या तब्बल 10 लाख कर्मचारी असलेले केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे.

सीआरपीएफ जवानाने शेवट्या श्वासापर्यंत कोरोनाशी लढा दिला. सोमवारी मी त्यांच्या कुटंबीयाशी बोललो होतो आणि त्यांना धीर दिला होता. या कठिण परिस्थितीत संपूर्ण देश त्यांच्याबरोबर असल्याचे आश्वासनही दिल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी जवानाच्या निधनानंतर सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.