बंगळुरू - सध्या इंग्लडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेची सर्वत्र धूम आहे. विश्वकरंडक कोण जिंकणार, अंतिम सामन्यात कोणासोबत कोणाचा मुकाबला होणार या चर्चांना सध्या चांगलाच रंग आला आहे. यातच बंगळुरूच्या एका सराफ व्यापाऱ्याने केवळ १.५ सेमी उंचीची विश्वकरंडकाची सोन्याची प्रतिकृती बनवली आहे.
![golden world cup trophy](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/cm-cup2_0307newsroom_1562156447_526.jpg)
बंगळुरू येथील सराफ नटराज रेवणकर यांनी हा विश्वकरंडक बनवला आहे. हा 'मिनी वर्ल्ड कप' त्यांच्या पेढीवर आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. हा करंडक इतका छोटा आहे की, अगदी बोटाच्या पेराच्या तळभागावर बसू शकतो. याचे वजन ०.४९ ग्रॅम इतके आहे. इतक्या छोट्या विश्वकरंडकाला पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
![golden world cup trophy](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/cm-cup1_0307newsroom_1562156447_316.jpg)