ETV Bharat / bharat

काश्मीरमधील भव्यदिव्य लग्नसमारंभांवर कोविडचे सावट - कोरोनाचा काश्मीरमधील लग्नांवर परिणाम

सहा महिन्यांच्या कडाक्याच्या थंडीची जागा वसंत ऋतूतील उन्हाने घेतल्यानंतर मार्च महिन्यात काश्मीरमधील लग्नाचा हंगाम सुरू होतो. तथापि, या वर्षी कोविडचा प्रादुर्भाव झाला आणि नवीन अटी व शर्तींनी लग्नाचे स्वरूप बदलले आणि त्यातील पारंपरिकपणा देखील कमी केला.

काश्मीर
काश्मीर
author img

By

Published : Sep 26, 2020, 6:18 PM IST

Updated : Sep 26, 2020, 6:25 PM IST

श्रीनगरच्या मुदस्सीर याकूबचे लग्न ठरले, तेव्हा दिवशी त्याने आपल्या भावी वधूबरोबर मिळून भव्यदिव्य लग्नाचे नियोजन केले होते. लग्नासाठी मागील वर्षातील ऑगस्ट महिन्यातील तारीख देखील निश्चित करण्यात आली. परंतु भाजपाप्रणीत सरकारने कलम 370 रद्द केले आणि तत्कालीन परिस्थितीनुसार मुदस्सीरला आपले लग्न मार्चपर्यंत पुढे ढकलावे लागले. त्याचदरम्यान मार्चमध्ये कोविड साथीच्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाउन जाहीर झाला आणि लग्नाची तारीख पुन्हा बदलावी लागली.

या सर्व घडामोडींमध्ये, आयुष्यातील अतिशय मौल्यवान आणि आनंदी क्षणाची प्रतीक्षा करणाऱ्या मुदस्सीरसाठी का कालखंड वेदनादायक ठरला. लग्नासाठी निमंत्रित पाहुण्यांची यादी शासनाकडे पाठवून त्यांची परवानगी घ्यावी लागेल असे 25-वर्षाच्या नवरदेवाला कधीच वाटले नव्हते.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आमच्या लग्नाची तारीख निश्चित झाली होती. पण कलम 370 रद्द झाले आणि काश्मिरची परिस्थिती आणखी बिकट झाली. परिणामी, आम्हाला आमचे लग्न पुढे ढकलावे लागले. यावर्षी मार्चमध्ये आम्हाला कोविडमुळे पुन्हा एकदा लग्न थांबवावे लागले. काश्मीरमधील विवाह मोठ्या थाटामाटात आणि विविध कार्यक्रमांच्या रेलचेलीत साजरे केले जातात. दुष्काळात जशी पावसाची प्रतीक्षा असते त्याप्रमाणे वधू आणि वर लग्नाच्या दिवसाची वाट पाहतात. लग्नाला उपस्थित पाहुण्यांची यादी काही आठवड्यांपूर्वीच तयार केली जाते आणि पाहुण्यांना मोठ्या हॉलमध्ये तांब्याच्या प्लेट्समध्ये बहु-पाककृती डिश वाझवान दिली जाते. वर आणि वधू फॅन्सी सूट परिधान करतात.

सहा महिन्यांच्या कडाक्याच्या थंडीची जागा वसंत ऋतूतील उन्हाने घेतल्यानंतर मार्च महिन्यात काश्मीरमधील लग्नाचा हंगाम सुरू होतो. तथापि, या वर्षी कोविडचा प्रादुर्भाव झाला आणि नवीन अटी आणि शर्थींनी लग्नाचे स्वरूप बदलले आणि त्यातील पारंपारिकपणा देखील कमी केला. नवीन मानकांनुसार, झोनच्या वर्गीकरणानुसार, अतिथींची संख्या 30 ते 50 पर्यंत मर्यादित केली गेली आहे.

नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलीस महामारी कायद्यानुसार कारवाई करतात. याविषयी बोलताना श्रीनगरचे उपायुक्त शाहिद इक्बाल चौधरी म्हणाले की, विवाह सोहळ्यांना परवानगी घेणे आवश्यक असून आणि सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. कोविड-19 विषाणूच्या संसर्ग प्रसाराने काश्मिरातील जनजीवन आणि व्यवसायांवर विपरीत परिणाम झालाआहे. आतापर्यंत 41560 लोक संक्रमित झाले आहेत तर, 778 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवीन अटी आणि शर्थींमुळे काश्मीरमधील विवाह सोहळ्याची कल्पना बदलली आहे. विस्तारित कुटुंबे आणि मित्र परिवाराबरोबर एकत्र मेजवानी येण्याचे क्षण अगोदरच कमी असताना आता त्यावरदेखील बंधने आली आहेत. मुदस्सिर म्हणाले, यावर्षी ऑगस्टमध्ये प्रशासनाची परवानगी घेतल्यानंतर आम्ही आमचे लग्न केले. कोविड-19 संदर्भातील सर्व नियमांचे पालन केले गेले. गर्दी टाळणे आवश्यक असल्याने आम्ही आमच्या नातेवाईकांना आमंत्रित करू शकलो नाही. लग्न समारंभे प्रादेशिक आर्थिक रचनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या क्षणी मेजवानी आणि डेकोरेशनसह विविध गोष्टींवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. या महामारीतून आपल्याला बरेच काही शिकायला मिळाल्याचे मुदस्सिर म्हणाले. या साथीच्या रोगामुळे आम्हाला अतिशय साध्या पद्धतीने विवाह करण्याचा फायदा झाला. मोठ्या मेळाव्यात वाया जाणाऱ्या अन्नाची बचत करता आली. तसेच यामुळे पैशांची देखील बचत झाली.

Last Updated : Sep 26, 2020, 6:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.