ETV Bharat / bharat

भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या पोहोचली 23 लाखांवर; 46 हजार जणांचा मृत्यू

दिल्लीत मागील 7 दिवसांत दररोज 1 हजार नवीन रुग्ण आढळत आहेत. सोमवारी 707 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. नवी दिल्ली सरकारच्या माहितीनुसार 13906 कोरोना बेडपैकी 3318 बेड वापरात आहेत. बुधवारी 1113 कोरोना रुग्णसंख्या वाढली.त्यामुळे दिल्लीतील रुग्णसंख्या 1.48 लाख एवढी झाली.

author img

By

Published : Aug 13, 2020, 5:38 AM IST

india corona update
भारत कोरोना अपडेट

हैदराबाद- भारतात दर दोन दिवसांनी 1 लाख कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. मात्र, ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक रनदीप गुलेरिया यांनी भारतात कोरोनारुग्ण संख्येची वाढ अत्युच्च पातळीवर पोहोचली नसल्याचे म्हटले आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 23 लाखांवर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 46 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

india corona condition
भारतातील कोरोना रुग्ण स्थिती

दिल्ली

नवी दिल्ली- काही काळ कोरोना रुग्णसंख्या वाढ कमी झाल्यानंतर दिल्लीत कोरोना रुग्ण पुन्हा वाढत आहेत. मागील 7 दिवसांत दररोज 1 हजार नवीन रुग्ण आढळत आहेत. सोमवारी 707 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. नवी दिल्ली सरकारच्या माहितीनुसार 13906 कोरोना बेडपैकी 3318 बेड वापरात आहेत. बुधवारी 1113 कोरोना रुग्णसंख्या वाढली.त्यामुळे दिल्लीतील रुग्णसंख्या 1.48 लाख एवढी झाली. दिल्लीत कोरोनामुळे 4153 जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत एकूण रुग्णसंख्या 1 लाख 48 हजार 504 आहे. 1 लाख 33 हजार 405 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीत सध्या 10 हजार 946 सक्रिय रुग्ण आहेत.

महाराष्ट्र

मुंबई- राज्यात बुधवारी पुन्हा आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. १२ हजार ७१२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.६४ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ४७ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

बिहार

पाटणा- दररोज राज्यामध्ये 1 लाख लोकांच्या कोरोना तपासणी करणार असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले. आरटीपीसीआरद्वारे दररोज 75 हजार नमुने तपासले जात आहेत. आरटीपीसीआर सुविधा आणखी 5 वैद्यकीय महाविद्यालयात सुरु करणार असल्याचे नितीशकुमार यांनी म्हटले. यामुळे प्रतिदिन सरासरी 2300 तपासण्या वाढतील असे त्यानी सांगितले.

झारखंड

रांची- झारखंड राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. दरम्यान, बुधवारी 591 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.राज्यातील एकूण रुग्णसंख्या 19578 वर पोहोचली आहे. झारखंडमधील रुग्ण बरे होण्याचा दर 54.21 एवढा आहे तर मृत्यूदर 0.99 आहे. राज्यात 194 जणांचा कोरोनामुळ मृत्यू झाला.

राजस्थान

जयपूर - राजस्थानातील अलवार जिल्ह्यातील काही भागात बुधवारी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. कोटवाली पोलीस ठाण्यात कोरोना केसेस आढळल्या होत्या. अलवार मध्ये लॉकडाऊन 22 ऑगस्टपर्यंत सुरु राहील. यादरम्यान सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत दुकाने सुरु राहतील. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता बनस्वारा जिल्हा प्रशासनाने पूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला.

उत्तराखंड

डेहराडून- बुधवारी 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 140 वर पोहोचली आहे. उत्तराखंड राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजार 886 एवढी झाली आहे. दिवसभरात 217 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारपर्यंत 6 हजार 726 जण कोरोनामुक्त झाले. 4 हजार 20 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ओडिशा

भुवनेश्वर- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 50 हजार 672 वर पोहोचली आहे. दिवसभरात 1876 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यात सध्या 15 हजार 508 सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात 1673 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे ओडिशा राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 36 हजार 478 वर पोहोचली. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 305 जणांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.