हैदराबाद - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन सरकारी यंत्रणांमार्फत केलं जात आहे. यावेळी अनेक जण लॉकडाउनच्या काळात घरामध्ये वेळ घालवण्यासाठी कॅरम, बुद्धीबळ, लुडो किंवा उणो सारखे काही घरातील खेळ खेळत आहेत. यावेळी काही जण शेजारील घरातील लोकांना घरी बोलवून गेम्स खेळत आहे. कोरोना संकटात शेजाऱ्यांना सोबत घेऊन गेम खेळेण धोकादायक असून याबाबत तेलंगाणा पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
नुकतचं सुर्यापेठ येथील एका महिलेने गेम खेळताना कमीतकमी 31 जणांना विषाणू संक्रमित केला होता. तसेच एका लॉरी चालकानेही पोकर गेम खेळताना अनेकांना विषाणू संक्रमित केला होता. या पार्श्वभूमीवर 4 हून अधिक जणांनी एकत्र येत गेम खेळणाऱयावर तेलंगाणा पोलिसांनी आक्षेप घेतला आहे.
जास्त लोकांनी एकत्र येत गेम खेळल्यास मोठा धोका निर्माण होतो. आशामुळे कोरोनाचे अधिकाधिक सक्रंमण होईल. त्यामुळे डिस्टंन्स पाळणे गरजेचे आहे. एकाच कुटुंबातील लोकांनी सोशल डिस्टन्स पाळत गेम्स खेळावे. मात्र, शेजार्यांसोबत खेळणे धोकादायक आहे. याबाबत काळजी घ्यावी, असे राचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत म्हणाले.
जगात करोनाचा फैलाव वेगानं होत असून अनेक देशांमध्ये हाहाकार माजला आहे. अशातच भारतातही काही वेगळी परिस्थिती नाही. परंतू, सरकारनं वेळीच पावलं उचलल्याने त्याचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, अवघा देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. घराच्या दारात लक्ष्मण रेषा ओढून ठेवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केलं आहे.