नवी दिल्ली - देशातील कोरोना साथीचा विळखा आणखी घट्ट होत असून गेल्या 24 तासात उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली आहे. तब्बल 26 हजार 506 नवे कोरोनाग्रस्त आढळले असून 475 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 8 लाखाजवळ पोहोचला आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 7 लाख 93 हजार 802 इतका झाला आहे. सध्या 2 लाख 76 हजार 685 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 4 लाख 95 हजार 513 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर एकूण 21 हजार 604 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आतापर्यंत 9 हजार 667 मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच, एकूण रुग्णसंख्या 2 लाख 30 हजार 599 वर गेली आहे. यातील एकूण 93 हजार 673 केसेस अॅक्टिव्ह आहेत. तर 1 लाख 27 हजार 259 जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
महाराष्ट्रानंतर सर्वांत जास्त मृत्यू दिल्लीमध्ये झाले आहेत. दिल्लीत आतापर्यंत 3 हजार 258 जणांचा बळी गेला आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 1 लाख 7 हजार 51 वर पोहोचली आहे. तर 21 हजार 567 रुग्णांवर उपचार सुरू असून 82 हजार 226 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
गुजरात राज्यात 39 हजार 194 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 लाख 26 हजार 581 कोरोनाबाधित तर 1 हजार 765 जणांचा बळी गेला आहे.