ETV Bharat / bharat

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 91 लाख पार, मृतांची संख्या 1 लाख 33 हजारच्या पुढे - देशातील कोरोना आकडेवारी

औषध निर्मिती करणारी कंपनी एस्ट्राजेनेकाने सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) घोषणा केली की, इंग्लंड आणि ब्राझीलमध्ये झालेल्या कोरोना वॅक्सीन कोरोनाग्रस्तांसाठी प्रभावी ठरत आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 24, 2020, 6:24 AM IST

हैदराबाद : भारतात मागील 24 तासांत 44 हजार 59 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. एकूण रुग्णांची संख्या 91 लाख 39 हजार 865 वर पोहोचली आहे. केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्रालयाने सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) ही आकडेवारी जाहीर केली आहे. 511 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1 लाख 33 हजार 738 रुग्णांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाला आहे.

देशात सध्या 4 लाख 43 हजार 486 इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 85 लाख 62 हजार 641 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत 41 हजार 24 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

आकडेवारी
आकडेवारी
  • महाराष्ट्र

राज्यात 4 हजार 153 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 17 लाख 84 हजार 361 वर पोहोचला आहे. राज्यात सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) 30 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 46 हजार 653 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.61 टक्के आहे. राज्यात सोमवारी एकूण 81 हजार 902 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

  • नवी दिल्ली

राज्यात सोमवारी सायंकाळपर्यंत 4 हजार 454 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून बाधितांचा एकूण आकडा 5 लाख 34 हजार 317 वर पोहोचला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत 121 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण 8 हजार 512 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 7 हजार 216 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

  • आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश राज्यात सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) 545 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 8.62 लाख वर पोहोचला आहे. सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) 1 हजार 390 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 10 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून राज्यात आतापर्यंत 6 हजार 948 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चित्तूर जिल्ह्यात सर्वाधिक 822 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

  • जम्मू-कश्मीर

जम्मू-कश्मीरमध्ये 351 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. राज्यातील एकूण बाधितांची संघ्या 1 लाख 6 हजार 899 झाली आहे. केंद्र शासित प्रदेशातील विविध रुग्णालयात सोमवारी 608 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यातील 99 हजार 827 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा - काँग्रेसच्या 'या' मुस्लीम आमदाराने घेतली संस्कृतमध्ये शपथ

हेही वाचा - कोरोना लसीवरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारले 'हे' चार महत्त्वाचे प्रश्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.