हैदराबाद - गेल्या दहा दिवसांत दिल्लीतील गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 800वर गेली आहे. उत्सवामुळे गर्दी होत असल्यामुळे, प्रदुषणातील वाढ आणि इतर कारणांमुळे 23 ऑक्टोबरपासून कोरोनाबाधितांमध्ये दैनंदिन मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 19 ऑक्टोबरला गृहविलगीकरणात असलेल्या बाधितांची संख्या 14 हजार 164 इतकी होती. तर 20 ऑक्टोबरला त्यात घसरण होऊन ती 14 हजार 46 इतकी झाली. त्यानंतर, या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. 31 ऑक्टोबरला ही आकडेवारी 20 हजार 93 इतकी असल्याचे अधिकृत आकडेवारीवरून समोर आले आहे.
भारतीय नियामक प्राधिकरणांकडून (IRA) आवश्यक मंजुरी मिळाल्यास भारत बायोटेक पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कोरोनावरील लस बाजारात आणण्याची योजना आखत आहे. कंपनीने ही लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (NIV) सहकार्याने निष्क्रिय Sars-Cov-2 विषाणू (ज्यामुळे कोरोना आजार होतो) वापरुन विकसित केले गेली आहे. आयसीएमआरच्या प्रयोगशाळेत या विषाणूला विलग करण्यात आले होते.
- महाराष्ट्र
मुंबई - गोकुलदास तेजपाल (GT) रुग्णालयातील डॉक्टरांनी राज्य सरकारकडून जीटी रुग्णालयाला नॉन-कोविड सुविधामध्ये परिवर्तित करण्यासाठी विचार करायला दबाव टाकणे सुरू केले आहे. कारण या रुग्णालयात मार्चनंतर नियमित स्वरुपात नॉन-कोविड प्रक्रिया सुरू आहेत.
एका महिन्यांहून अधिकच्या काळपर्यंत कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर पुण्यात शनिवारी रुग्णसंख्येत थोडी वाढ झाली. पुण्यात शनिवारी 25 सप्टेंबरनंतर पहिल्यांदा नविन कोरोनाबाधितांची संख्या कोरोनावर मात केलेल्यांच्या तुलनेत अधिक होती.
- तामिळनाडू
चेन्नई - नुकत्याच आलेल्या बुलेटिननुसार, तामिळनाडूचे कृषीमंत्री दोराइकन्नू कोरोनामुळे आयुष्याशी संघर्ष करत आहे. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. 72 वर्षीय मंत्र्यांची तब्येत सतत खालावत आहे. कावेरी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज म्हणाले, रुग्णालयाने या आठवड्याच्या सुरुवातीलाच सांगितले होते की, मंत्री दोरािकन्नू यांच्यावर कोरोनाव्यतिरिक्त न्यमोनियाचाही उपचार करण्यात येत आहे.
- उत्तर प्रदेश
लखनऊ - शाहजहानपुरचे जिल्हाधिकारी यांच्या पत्नी आणि बेटीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांच्याव्यतिरिक्त शाहजहानपुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ते गृह विलगीकरणात आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
- आसाम
गुवाहटी - आसामच्या काजीरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्ती सफारी आज पुन्हा सुरू झाली. पार्क प्रशासनाने कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत फक्त 37 जागांच्या नोंदणीला परवानगी दिली आहे.