ETV Bharat / bharat

देशातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

भारतात कोरोनाची रुग्णसंख्या 78 लाख 14 हजार 682वर पोहोचली आहे. यासोबत मागील 24 तासांत देशात 53 हजार 370 नविन बाधितांची नोंद करण्यात आली. तर देशात आतापर्यंत 70 लाख 16 हजार 046 रुग्णांनी कोरोनावर मात केली. याबरोबरच देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 89.78 टक्के इतका आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

COVID-19 news from across the nation
देशातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी
author img

By

Published : Oct 25, 2020, 2:44 AM IST

हैदराबाद - सरासरीनुसार, महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त कोरोना अँटिबॉडी तयार करतात, असे मत पोर्तुगिज संशोधकांनी व्यक्त केले आहे. एका रुग्णांच्या तुलनेत 90 टक्के रुग्णांमध्ये एसआरएस-सीओव्ही -2 विषाणूची लागण झाल्यावर सात महिन्यांपर्यंतची अ‍ॅटीबॉडीज आढळतात, असेही त्यांनी नमूद केले आहे.

COVID-19 news from across the nation
भारतातील कोरोनाची सद्यस्थिती.

युरोपियन जर्नल ऑफ इम्यूनोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या निकालांमध्ये हे देखील दिसून आले आहे की, वय हे अँटीबॉडीजच्या पातळीवर तयार होणारे एक गोंधळात टाकणारे घटक नाही, परंतु रोगाची तीव्रता देखील आहे.

निष्कर्षांसाठी, संशोधन पथकाने अंतर्गत संवेदनशील विशिष्ट आणि अष्टपैलू कोविड-19 सेरोलॉजी चाचणी केली. त्यांनी 300 पेक्षा जास्त कोविड-19 रुग्णालयांतील रूग्ण, आरोग्यसेवा कर्मचारी आणि 200पेक्षा जास्त कोविड-19 स्वयंसेवकांच्या प्रतिपिंडाचे निरीक्षण करणे सुरू केले.

दरम्यान, भारतात कोरोनाची रुग्णसंख्या 78 लाख 14 हजार 682वर पोहोचली आहे. यासोबत मागील 24 तासांत देशात 53 हजार 370 नविन बाधितांची नोंद करण्यात आली. तर देशात आतापर्यंत 70 लाख 16 हजार 046 रुग्णांनी कोरोनावर मात केली. याबरोबरच देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 89.78 टक्के इतका आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

देशात आतापर्यंत 1 लाख 17 हजार 956 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत 650 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील मृत्यूदर 1.51 टक्के इतका आहे. सध्या देशात 6 लाख 80 हजार 680 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांची संख्या 8.71 टक्के इतकी आहे. आयसीएमआरनुसार, 23 ऑक्टोबरपर्यंत 10 कोटी 13 लाख 82 हजार 564 जणांची नमुना चाचणी करण्यात आली आहे. यात शुक्रवारी 12 लाख 69 हजार 479 जणांची नमुना चाचणी करण्यात आली.

  • केरळ -

कोरोनाच्या नियमावलीमध्ये शिथिलता देत राज्य सरकारने नवी मार्गदर्शिका जाहीर केली. यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईंनकांना त्यांना बाधितावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी बाधिताचे अंतिम दर्शन करता येणार आहे. आरोग्यमंत्री केके शैलजा म्हणाल्या, यात मृताच्या अत्यंत जवळच्या नातेवाईंकांना बाधिताच्या अंत्यसंस्कारापूर्वी बाधिताचे अंतिम दर्शन घेता येणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत अंत्यसंस्कारात गर्दी होऊ नये. शेवटच्या धार्मिक विधी शरीराला स्पर्श न करता केल्या पाहिजेत. ज्यांनी मृतांचे चेहरे पाहण्याची परवानगी दिली त्यांना स्पर्शही करु नये. 60 वर्षांपेक्षा जास्त किंवा 10 वर्षांपेक्षा कमी कुणीही मृतदेहाच्या संपर्कात येऊ नये. तसेच अंतिम संस्काराच्या वेळी आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनांचे विधिवत पालन केले पाहिजे, असेही शैलजा म्हणाल्या.

  • महाराष्ट्र -

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर ते आयसोलेशनमध्ये गेले आहेत. शनिवारी त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.

ट्विटमध्ये त्यांनी लिहलंय, 'लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.'

दरम्यान, राज्यात सध्या 1 लाख 44 हजार 426 अॅट्विव्ह रुग्ण आहेत. तर 43 हजार 15 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 14 लाख 45 हजार 103 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

  • तेलंगाणा -

राज्यात 1 हजार 273 नविन बाधितांची नोंद करण्यात आली. तर 1 हजार 708 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याबरोबरच राज्यातील एकूण बाधितांची संख्या 2.3 लाखांवर गेली आहे. तर सध्या राज्यात 19 हजार 937 इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मागील 24 तासांत राज्यांत सर्वाधिक 224 रुग्ण जीएचएमसीत आढळले आहेत. त्यानंतर मेडच्चल मलकाजगिरी जिल्ह्यात 104, रंगारेड्डी 102, नालगोंडा 76, खम्माम 75, भद्राद्री कोथागुडेम 69, करीमनगर 55, वारांगल शहरी 51, सिद्दीपेट 41, रंजना सिरसिला 32, सूर्यापेठ 31, निझामाबाद 30 आणि इतर इतक्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मागील एका दिवसात 5 बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या 1 हजार 303 इतकी झाली आहे.

  • दिल्ली -

राज्यात शुक्रवारी 4 हजार बाधितांची नोंद करण्यात आली. यामुळे सणासुदीच्या काळात ही धोक्याची घंटा आहे. 19 ऑक्टोबर वगळता मागील 10 दिवसांपासून राज्यात दररोज जवळपास 3 हजार बाधितांची नोंद करण्यात येत आहे. एकीकडे राष्ट्रीय स्तरांवर कोरोनाची आकडेवारी कमी होत असताना दिल्लीतील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक बाब आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी राष्ट्रीय राजधानीतील शाळा पुन्हा सुरू करण्यास नकार दिला. केजरीवाल यांनी एका कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांना सांगितले की, “सध्या शाळा पुन्हा सुरू होणार नाहीत.”

  • जम्मू काश्मिर -

शनिवारी येथे 577 बाधितांची नोंद करण्यात आली. याबरोबरच राज्यातील एकूण बाधितांची संक्या 91 हजार 329 इतकी झाली आहे. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच राज्यातील कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या 1 हजार 430 इतकी झाली आहे.
शनिवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जम्मू येथून 213 तर काश्मिर व्हॅलीतील 364 रुग्ण आहेत. तर श्रीनगरमध्ये सर्वात जास्त 130 नविन बाधित आठळले आहेत. त्यापाठोपाठ जम्मू जिल्ह्यात 116 बाधितांची नोंद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.